या लेखात Cat Information in Marathi व मांजर विषयी मराठी माहिती देण्यात आलेली आहे.
जगभरामध्ये मांजरीला पाळीव प्राणी म्हणून पाळले जाते. मांजरीला वाघाची मावशी या नावाने देखील ओळखले जाते. मांजर हा मांसाहारी प्राणी आहे, ती प्रामुख्याने उंदीर, पक्षी तसेच दूध व छोटे प्राणी खाते.
आपल्या देशामध्ये जवळपास 3 दशलक्ष मांजरी पाळीव प्राणी म्हणून पाळल्या जातात. तसेच हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याशिवाय अमेरिकेमध्ये तर जवळपास 25 टक्के घरांमध्ये मांजरी पाळल्या जातात.
मांजर हा प्राणी फेलिडे कुटुंबातील आहे या कुटुंबात वाघ, सिंह तसेच चित्ते देखील येतात. मांजरीला हिंदी मध्ये बिल्ली इंग्रजीत कॅट तसेच शास्त्रीय भाषेमध्ये फेलीस कॅटस या नावाने ओळखले जाते.
मांजर विषयी मराठी माहिती - Cat Information in Marathi
मित्रांनो पुढे आपणास मांजर ची संपूर्ण मराठी माहिती देत आहोत.
मांजरीचा इतिहास (Origin of cats)
प्राचीन काळामध्ये इजिप्तमध्ये लोक पाळीव प्राणी म्हणून मांजरीला पाळत होते, त्यामागचं कारण म्हणजे त्या उंदरांचा शिकार करून त्यांना खात असत व ज्यामुळे धान्य तसेच इतर महत्वाच्या वस्तूंची नासधूस टाळता येई. आजच्या काळामध्ये मांजरीला लोक पाळीव प्राणी म्हणून पाळतात. याशिवाय काही मोकाट फिरणाऱ्या मंजरी देखील असतात, त्यांना भटक्या मांजरी अश्या नावाने ओळखलं जात.
मांजरींना पाळीव प्राण्याच्या रूपामध्ये पाळलं जात होत असा पुरावा आपणास ईसवी सण पूर्ण ७५०० च्या दरम्यान साइप्रस ह्या बेटावर पाहायला मिळाला होता. आधीच्या काळामध्ये इजिप्तची लोक हि मांजरीची पूजा करत असत तसेच त्यांना ममी बनवत होते त्यामुळे त्या कायम मालकासोबत राहतील हे त्यामागचं कारण होत.
विविध देशांमध्ये मांजरीसाठी विशिष्ट आहार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मांजरीला योग्य आहार दिल्यास ती जास्त काळ जगू शकते तसेच जर अयोग्य आहार दिला तर ते तिच्या आरोग्यास अहितकारी ठरू शकते.
मांजरीच्या पूर्वजांमध्ये झालेल्या बदलामुळे मांजरीची गोड वस्तूची चव ओळखण्याची क्षमता नष्ट झालेली आहे, त्यामुळे त्यांना गोड व्यंजनांची चव कळत नाही.
मांजरीची शारीरिक रचना
मांजरीला डोके, दोन टोकदार असे कान व गोंडस असा लहान चेहरा असतो. मांजरीच्या चेहऱ्यावर जो लांब केस असतो त्याद्वारे त्यांना सभोवताली असणाऱ्या गोष्टींचे ज्ञान होते. याशिवाय मांजरीला दोन मोठे डोळे असतात त्यांच्याद्वारे ते चांगल्या पद्धतीने पाहू शकतात. मांजरीच्या शरीरावर मऊ केस असतात तसेच त्यांची शेपटी लांब असते ज्याच्याबरोबर त्यांना खेळायला आवडते. त्यांना चार पाय असतात व त्यांचे पंजे हे मऊ असतात. मांजरी या अतिशय लांब उडी मारू शकतात. त्या चंचल स्वभावाच्या असतात . त्यांना मिठी मारायला आवडते.
मांजरीचा स्वभाव
मांजरीचा स्वभाव हा वेगवेगळा असू शकतो त्यामागे त्यांचं वय, प्रकार तसेच त्यांचा आधीचा अनुभव या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. जास्तकरून मांजरीचा स्वभाव हा चंचल, फ्रेंडली असतो व त्यांना मनुष्यासोबत व इतर मांजरींसोबत खेळायला आवडते.
मांजरीचा आहार
अनेकदा मांजरी ह्या जे त्यांचे मालक आहार देतात तेच खात असतात. परंतु याशिवाय बाजारामध्ये मांजरींसाठी विशेष आहार उपलब्ध आहे, ज्यामध्ये त्यांना आवश्यक असणारे पोषक तत्व आढळतात.
मांजरीचे प्रमुख अन्न उंदीर असते. ती घरात आढणाऱ्य उंदरांची शिकार करते. याशिवाय मांजरी या लहान मोठे पक्षी व मृत प्राण्यांचे मांस देखील खात असतात.
मांजरीच प्रजनन
मांजरी तेव्हाच एकत्र येतात जेव्हा राणी (मादी) हि उष्णतेमध्ये असते. हा उष्णतेचा काळ जवळपास २ आठवड्यांचा असतो आणि तो ४ ते ६ दिवसांपर्यंत चालतो.
मांजरीच्या प्रजनन प्रक्रियेमध्ये खालील घटना घडतात.
मांजर (मादी) व बोका (नर) हे एकत्र येण्याआधी मांजरी कडे अनेक बोके आकर्षित होतात. मांजरी सोबत एकत्र येण्यासाठी बोके हे एकमेकांबरोबर लढतात. व त्यामध्ये जो जिंकतो तो मांजरी सोबत एकत्र येतो. अश्या पद्धतीने मांजरी मध्ये प्रजनन प्रक्रिया होते.
गरोदर मादी हि शांत आणि सुरक्षित जागी आपल्या पिल्लांना जन्म देते. पिल्ल्यांचे डोळे हे दोन आठ्वड्यानंतर उघडतात. जोपर्यंत पिल्ले स्वतःचा आहार स्वतः मिळवण्या योग्य होत नाही तोपर्यंत मांजर त्यांची काळजी घेत असते व स्वतः शिकार करून त्यांना अन्न आणून देत असते.
मांजरींच्या विविध जाती
जगभरात 40 -70 प्रकारच्या मांजरीच्या विवीध जाती आहेत.
सी. एफ. ए(कॅट फॅन्सी अर्स असोसिएशन)च्या म्हणण्यानुसार, 42 तसेच टी. आय. सी. ए.(द इंटरनॅशनल कॅट असोसिएशन)च्या म्हणण्यानुसार 71 मांजरींच्या जाती आढळतात. यामध्ये असणाऱ्या काही प्रमुख जाती पुढील प्रमाणे आहेत.
1) भारतीय मांजर किंवा स्पॉटेड कॅट
उत्पती - भारतीय
स्वभाव - फ्रेंडली
आयुष्य -10-18 वर्ष
ही भारतामध्ये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. भारतामध्ये असणाऱ्या चांगल्या जातीतील एक मांजर ही सुद्धा आहे.
2) बंगाल कॅट
उत्पती - यू. एस. ए
स्वभाव - प्रेमळ आणि उर्जावान
आयुष्य -10-16 वर्ष
ही मांजर चित्त्या सारखी दिसते. भारतामध्ये असणाऱ्या बुद्धिमान आणि एथलेटीक मांजरीच्या जातींपैकी ही एक आहे.
3) बॉम्बे कॅट
उत्पती - यू. एस. ए
स्वभाव - प्रेमळ
आयुष्य -9-13 वर्ष
ही भारतीय ब्लॅक पँथर च्या छोट्या रुपासारखी दिसते.ही भारतामधील लोकप्रिय मांजरीच्या जातींपैकी एक मांजर आहे.
4) हिमालयन कॅट
उत्पती - अमेरिका
स्वभाव - शांत , फ्रेंडली
आयुष्य - 9-15 वर्ष
ह्या मांजरींमध्ये आपणांस पर्शियन मांजरीसारखे केस तसेच सियामिज मांजरीसारखा रंग पाहायला मिळतो.
5) सियामिझ कॅट
उत्पती - थायलंड
स्वभाव - उर्जावान, प्रेमळ
आयुष्य -10-12 वर्ष
ह्या मांजरीची विशेषता म्हणजे ही सर्वात प्राचीन पाळीव मांजर आहे. ही 14 व्या शतकात थायलंड मध्ये पाहायला मिळाली होती.
6) मेन कून
उत्पती - अमेरिका
स्वभाव - फ्रेंडली
आयुष्य - 12-17 वर्ष
यांचे वजन 8.16 किलो तसेच लांबी ही 40 इंचेपर्यंत असू शकते.
8) अमेरिकन बॉबटेल
उत्पती - अमेरिका
स्वभाव - प्रेमळ
आयुष्य - 13-15 वर्ष
या मांजरीच नाव हे तिच्या छोट्या शेपटी मुळे ठेवण्यात आलेले आहे. ही भारतीय घरांमधील सर्वात चांगल्या मांजरीच्या जातींपैकी एक आहे.
मांजरींबद्दल ची काही मनोरंजक तथ्ये
- आपल्या घरामध्ये असणाऱ्या मांजरीचा आणि वाघाचा DNA यामध्ये ९६ टक्के समानता पाहायला मिळते.
- मांजरीला थंडी मध्ये आगीच्या शेजारी बसायला फार आवडत.
- माणसांच्या गंधग्रहणशक्ती पेक्षा 14 पटीने जास्त ही मांजरीची गंधग्रहणशक्ती असते.
- युरोप मध्ये घरामध्ये पाळल्या जाणाऱ्या मांजरी ह्या वर्षाला 8 करोड उंदिरांची शिकार करतात.
- मांजरी 1000 प्रकारचे आवाज काढू शकतात तर कुत्रे हे फक्त 10 प्रकारचे आवाज काढू शकतात
- मांजरीला गोड पदार्थ खाणे आवडत नाही कारण त्यांना गोड चव कळत नाही.
FAQ
मांजर किती वर्ष जगते?
मांजर हि साधारणपणें १३ ते १७ वर्षापर्यंत जगते काही नशीबवान मांजरी ह्या २० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ देखील जगू शकतात. सर्वात जास्त जगलेली मांजर हि ३८ वर्षाची होती.तसेच ज्या मांजरी घरामध्ये राहतात त्या १० ते २० वर्षांपर्यंत जगू शकतात व ज्या बाहेर जातात त्या २ ते ५ वर्षांपर्यंत जगतात. कारण त्यांना सुरक्षिततेचा तसेच आरोग्याचा धोका असू शकतो.
मांजराला कोण कोणते आजार होऊ शकतात?
मांजरींना बॅक्टरीया च इन्फेक्शन होऊ शकत तसेच कॅन्सर , फेलाईन ल्युकेमिया व्हायरस , डायबेटीस ,फेलाईन इम्म्युनो डेफिशियंसी व्हायरस आणि फेलाईन लोवर युरिनरी ट्रॅक्ट इत्यादी आजार होऊ शकतात.
मांजर घरात येणे अशुभ असते का?
नारदपुराणामध्ये याविषयी उल्लेख आलेला आहे त्यांच्यानुसार , मांजर वारंवार घरात येणे हे अशुभ आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते.
तर काही शास्त्रांनुसार मांजर हि देवी लक्ष्मी च रूप आहे ज्यामुळे आपल्या घरात संपत्ती व आपणांस आरोग्य लाभते.
मांजरी निष्ठावान असतात का ?
हो , मांजरी निष्ठावान असतात.पण कुत्रांपेक्षा वेगळ्या प्रकारे , त्यांची निष्ठा हि त्यांच्या इच्छेनुसार येते.
Read More
EmoticonEmoticon