Saturday, 29 January 2022

लग्न मंगलाष्टके मराठी (PDF) | Tulsi Vivah & Lagnachi Mangalashtak lyrics in Marathi

आजच्या या लेखात लग्न मंगलाष्टके मराठी PDF आणि Mangalashtak Marathi lyrics देण्यात आलेले आहेत. ही Mangalashtak lyrics in Marathi लग्न व तुळशीचे लग्न मंगलाष्टक म्हणून उपयोगी आहेत. 


मित्रहो आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत. मातापित्यांच्या पुढाकाराने आणि संमतीने होत असलेल्या धार्मिक पद्धतीच्या विवाहप्रसंगी महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या जवळपासच्या भागांमध्ये लग्न लागते वेळी म्हटल्या जाणाऱ्या पद्यरचनांना "मंगलाष्टके" असे म्हटले जाते. 


लग्नात मंगलाष्टके म्हणण्याची प्रथा महाराष्ट्रीयन समाजात विशेष प्रचलित आहे. लग्न लावणाऱ्या ब्राह्मणांद्वारे ही मंगलाष्टके विधिवत पद्धतीने म्हटली जातात. याशिवाय लग्नसमारंभात नवरदेव आणि नवरी वर अक्षतांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देण्याची प्रथा देखील महाराष्ट्रीयन समाजात प्रचलित आहे. मंगलाष्टके आणि अक्षतांचा आशीर्वाद घेऊन झालेले लग्न यशस्वी होण्याची संभावना दाट असते. अशी जोडपी अतिशय आनंद आणि सुख समाधानाने आयुष्यभरासाठी एकमेकांची सोबती बनून राहतात. तर चला पाहूया mangalashtak lyrics in Marathi.


मंगलाष्टके मराठी pdf


लग्न मंगलाष्टके मराठी - Lagnachi Mangalashtak lyrics in Marathi

 स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।

बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।

लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।

ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।


गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वति वेदीका ।

शिप्रा वेञवती महासूर नदी,ख्याता गया गंडकी।

पुर्णा पुर्ण जलै, समुद्र सरीता।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।२।।


लक्ष्मी कैस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरीश्वचंद्रमा।

गाव कामदुधा सरेश्वर गजो, रंभादिदेवांगना ।

अश्क सप्त मखो विषम हरिधनु शंखो मृतम चांबुधे ।

रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनम,कुर्वतु वो मंगलम।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।३।।


रामो राजमणी सदा विजयते रामम्।

रमेशम भजे रामेणाभिहता निशाचरचमु।

रामाय तस्मै नमः।

रामान्नस्ति परायणम् परतम् रामस्य दासोराम्यहम् ।

रामे चित्तलय सद भवतु मे भी राम मामुघ्दर।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।४।।


राणा भिमक रुक्मीणीस नयनी, देखोनी चिंता करी ।

हि कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासी म्या दिईजे।

आता एक विचार कृष्ण नवरा ,त्यासी समर्पु म्हणे।

रुख्मी पुञ वडील त्यासी पुसणे ।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।५।।


लाभो संतती संपदा बहु तुम्हा,लाभोतही सद्रुण ।

साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवा भूषण।

सारे राष्ट्रधुरिण हेचि कथिती किर्ति करा उज्वल।

गा ग्रहास्याश्रम हा तुम्हा वधूवरा देवो सदा मंगलम् ।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।६।।


विष्णूला फमला शिवसी गिरीजा, कृष्णा जशी रुक्मिणी।

सिंधुला सरिता तरुसि लतिका,चंद्रा जशी रोहिणी ।

रामासी जनकात्मजा प्रिया जशी, सवित्री सत्यवरता ।

तैशि ही वधु सजिरी वरीतसे, हर्ष वरासी आता।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।७।।


आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।

गृहतके मधुपर्क पुजन करा अन्त पाटते धरा।

दृष्टादृष्ट वद्य वरा न करिता , दोघे करावी उभी।

वाजंञे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।८।।

***


तर मित्रहो या लेखात आपण Mangalashtak lyrics in Marathi व Tulsi vivah mangalashtak पाहिलेत. ही मराठी मंगलाष्टके आपण लग्न समारंभ व तुळशीचे लग्न लागत असताना उपयोगात आणू शकतात. अशा करतो आपणास लग्नाची मंगलाष्टके (lagnachi mangalashtak) ही माहिती उपयोगी ठरली असेल. या माहितीला इतरांसोबत देखील शेअर करा. धन्यवाद.


READ MORE


EmoticonEmoticon