Wednesday, 18 October 2023

कुत्रा विषयी मराठी माहिती | Dog information in Marathi

Dog information in Marathi : मित्रांनो कुत्रा हा प्राणी जगभरात प्रत्येक ठिकाणी आढळतो. अनेक लोकांना कुत्रे पाळण्याची आवड असते. कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी असतो आणि वेळप्रसंगी आपल्या मालकासाठी तो प्राणही देतो. 

आजच्या या लेखात आपण कुत्र्याची मराठी माहिती- Dog information in Marathi प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करुया.


कुत्रा Dog information in Marathi

कुत्रा विषयी मराठी माहिती | Dog information in Marathi

कुत्र्या विषयी ची सर्व माहिती आपणास पुढे देत आहोत.

कुत्र्यांचा इतिहास

कुत्र्यांचा इतिहास जवळपास 15000 वर्ष जुना आहे. असे मानले जाते की कुत्रे हे लांडग्यांपासून विकसित झालेले आहेत. कुत्र्यांमध्ये असलेले अनुवंशिक साक्ष कुत्र्यांच्या लांडग्यांशी असलेले संबंध दर्शवतात. 

प्रारंभिक काळात कुत्र्यांचा उपयोग शिकार आणि रक्षणासाठी केला जायचा. हळूहळू जसा मनुष्य शेती करू लागला तसे कुत्रे ही शेतकऱ्याच्या गुराढोरांच्या रक्षणासाठी व त्यांना चरवण्यासाठी उपयोगात येऊ लागली. मानवी इतिहासात कुत्र्यांचा संपूर्ण उपयोग वाहतूक, युद्ध आणि सहवासासाठी केला गेलेला आहे. प्राचीन इजिप्त मध्ये कुत्र्यांना पवित्र प्राण्यांच्या रूपात पुजले जायचे आणि त्या काळात अनेक ठिकाणी कुत्र्यांना त्यांच्या मालकासोबत पुरले जायचे. 

कुत्र्यांचा उपयोग इतिहासात कशाकशा पद्धतीने केला गेला याबद्दलची संक्षिप्त माहिती पुढे देत आहोत:

15,000 वर्षाआधी: कुत्र्यांना पहिल्यांदा मनुष्याद्वारे पाळले गेले.

10,000 वर्षाआधी: कुत्र्यांचा उपयोग शिकारासाठी आणि रक्षणासाठी केला जाऊ लागला.

7000 वर्षाआधी: कुत्र्यांच्या उपयोग गुराढोरांना चरवण्यासाठी केला जाऊ लागला.

3,000 वर्षाआधी: कुत्र्यांच्या उपयोग वाहतूक, युद्ध आणि सहवास म्हणून केला गेला. 

18 ते 19 वे शतक: कुत्रे पाळणे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले व कुत्र्यांमध्ये प्रजनन वाढले.

आज: कुत्र्यांचा उपयोग विविध कार्यांसाठी केला जातो ज्यामध्ये कामकाजी कुत्रे व पाळीव कुत्रे सामील आहेत.


कुत्र्यांची शरीर रचना

कुत्र्याचे शरीर अवयव मध्ये डोके, मान, धड, शेपटी इत्यादीं प्रमुख अवयवांचा समावेश होतो.

कुत्र्याचे डोके त्याची सर्वात मोठी विशेषता असते. यांचे डोके, रुंद, गोल आणि थोडेसे चपट असते. कुत्र्यांचे डोळे चमकदार व मोठ्या आकाराचे असतात, त्यांची नाक विवश शक्तिशाली असते. याशिवाय कुत्र्यांना सामान्य पेक्षा एक लांब जीभ देखील असते.

कुत्र्यांची मान लवचिक असते व ज्यामुळे ते आपले डोके सहज इकडून तिकडे फिरवू शकतात. कुत्र्याच्या अंगावर छाती, पोट आणि पाठ यांचा समावेश होतो. कुत्र्याची छाती रुंद आणि स्नायूंनी भरलेले असते. पाठ लांब आणि मजबूत असते ज्यामुळे त्याला जलद धावण्यात मदत होते.

इतर प्राण्यांप्रमाणेच कुत्र्याला देखील एक शेपटी असते. कुत्रे आपली शेपटीचा उपयोग भावना व्यक्त करण्यासाठी करतात, याशिवाय संतुलन राखण्यासाठी व अंगावर बसणाऱ्या माशांना दूर पळविण्यासाठी देखील शेपटीचा उपयोग केला जातो.

एकंदरीत कुत्र्याची शरीर रचना त्याला विविध परिस्थितींमध्ये राहण्यासाठी अनुकूल बनवते. तो जलद धावू शकतो, उंच उड्या मारू शकतो, अवजड वस्तूंना ओढू शकतो आणि आपल्या नाकाद्वारे विविध गंध ओळखू शकतो. कुत्र्याच्या या विशेष शरीरचनेमुळे त्याला पोलीस, आर्मी व विविध यंत्रणा उपयोगात घेत असतात.


कुत्र्याचा स्वभाव

कुत्रा एक सामाजिक प्राणी आहे व त्याला मनुष्यासोबत राहायला आवडते. तो बुद्धिमान असतो आणि त्याला प्रशिक्षण देणे देखील सोपे असते. कुत्र्याचा स्वभावात विविध गोष्टींचा समावेश होतो या गोष्टी पुढील प्रमाणे:

भुंकणे: कुत्रे भुंकुन संवाद करीत असतात कुत्र्याच्या भुंकण्या मागे वेगवेगळी कारणे असतात ज्यामध्ये खुश असणे, उत्साहीत असणे, घाबरणे किंवा आक्रमक असणे इत्यादींच्या समावेश होतो. 

चावणे: कुत्रे दातांच्या व्यायाम करण्यासाठी अनेकदा काही गोष्टींना चावत असतात. महत्त्वाचे सामान कुत्र्यांद्वारे चावले


कुत्रा विषयी तथ्य - Facts about Dog in Marathi

  1. मनुष्याने जवळपास 30 हजार वर्षांपूर्वी कुत्र्याला पाळणे सुरु केले.
  2. कुत्र्याचा सरासरी जीवन काल 10 ते 14 वर्षांचा असतो.
  3. कुत्र्याचे पिल्लू जेव्हा जन्माला येथे तेव्हा ते अंध, बहिरे आणि बिना दातांचे असतात.
  4. आधीच्या काळात कुत्रे आणि लांडग्याचे पूर्वज एकच होते. म्हणून दोघी प्राण्याचे DNA सारखे आहेत.
  5. कोणतीही गोष्ट सुंघण्याची क्षमता कूत्र्यात मनुष्यापेक्षा 10 हजार पट जास्त असते, कुत्र्याचे नाक नेहमी ओले असते आणि नाकातील हा ओलसर पदार्थ त्यांची सूंघण्याची क्षमता वाढवतो.
  6. ज्या पद्धतीने मनुष्याच्या बोटांचे ठसे वेगवेगळे असतात त्याप्रमाणेच कुत्र्यांच्या नाकाचे ठसे वेगवेगळे असतात.
  7. Bloodhound नावाच्या प्रजाती मधील कुत्र्यांची सुघण्याची क्षमता एवढी तीव्र असते की त्यांना जगभरातील पोलिस फोर्स द्वारे वापरले जाते.
  8. कुत्र्यांच्या डोळ्यात तीन पापण्या असतात.
  9. जगातील सर्वात वृद्ध कुत्र्याचे नाव Maggie होते व त्याचा मृत्यू 30 वर्षाच्या वयात झाला होता.
  10. Great Dane प्रजातीचे कुत्रे जगात सर्वात उंच कुत्रे मानले जातात. या कुत्र्याची उंची 28 ते 30 इंच पर्यंत असते. याच प्रजाती मधील एक कुत्रा Zeus जगातील सर्वात उंच कुत्र म्हणून ओळखला जातो त्याची उंची 44 इंच आहे. 
  11. कुत्र्याचे रक्त 13 प्रकारचे असते. तर मनुष्याचे फक्त 4 प्रकारचे असते.
  12. एक सामान्य कुत्र्यात 2 वर्षाच्या मुलाएवढी बुद्धी असते.
  13. कुत्र्यांना लपाछपीचा खेळ खेळायला आवडते.
  14. अंतरिक्षात जाणारे सर्वात पाहिली कुत्री लायका होती. Laika ला 3 नोव्हेंबर 1957 मध्ये रशियाने अंतरीक्ष मध्ये पाठवले होते. परंतु अंतरिक्ष यान मधील अती उष्णतेमुळे तिचा मृत्यू झाला.
  15. कुत्र्याचे नाक आणि पंज्यांना घाम येत नाही.
  16. दहा वर्षापेक्षा जास्त वय झालेले 50% कुत्रे कॅन्सर च्या रोगाने मरतात.
  17. जगातील सर्वात जुनी कुत्र्यांची प्रजात सालुकी आहे. या जातीच्या कुत्र्यांची प्रजात ख्रिस्तपूर्व 329 ची मानली जाते. 
  18. संशोधनानुसार मानले जाते की कुत्रे जवळपास 1000 शब्द शिकू शकतात. 
  19. कुत्र्यांच्या पिल्ल्याच्या तोंडात 28 दात तर वयस्क कुत्र्यांच्या तोंडात 42 दात असतात. 
  20. चीनमध्ये दररोज 30000 कुत्र्यांना मटण बनवण्यासाठी मारून टाकले जाते. 
  21. जर कुत्रा हा त्याची शेपटी उजव्या बाजूला हलवत असेल तर याचा अर्थ तो आनंदी आहे. परंतु याउलट जर कुत्रा त्याची शेपटी डाव्या बाजूला हलवत असेल तर तो क्रोधात आहे. 
  22. कुत्रे सुद्धा मनुष्याप्रमाणे स्वप्न पाहतात. जर तुम्ही कधी झोपलेल्या कुत्र्याला पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की तो त्याचे पाय अशा पद्धतीने हलवत असतो जसे कोणाचा तरी पाठलाग करीत आहे. 
  23. चॉकलेट खाणे कुत्र्यांसाठी हानिकारक असते. बऱ्याचदा चॉकलेट खाल्ल्याने कुत्र्यांची मृत्यूही होते.
  24. कुत्रे शाकाहारी व मांसाहारी दोघी प्रकारचे पदार्थ खातात.
  25. आपल्या धार्मिक ग्रंथ जसे रामायण-महाभारत इत्यादींमध्ये अनेकदा कुत्र्याच्या उल्लेख केला आहे.
  26. बायबल मध्ये 35 वेळा कुत्र्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
  27. कुत्रे आणि मांजरी दोघांची पाणी पिण्याची पद्धत सारखीच असते.
  28. कुत्र्या अंधारात मनुष्य पेक्षा जास्त पाहू शकतात. 
  29. कुत्र्याला मनुष्याचा सर्वात वफादार मित्र मानले जाते. व कुत्रे आणि मनुष्याच्या मैत्रीचा इतिहास खूप जुना आहे.


रात्री कुत्रे का रडतात ?

कुत्र्यांचे ओरडायचे आवाज दररोज रात्री येतात. आपल्या देशात कुत्र्यांचे रडणे अशुभ मानले जाते. परंतु विज्ञानिक दृष्टिकोनातून रात्री कुत्री का रडतात हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. 

सर्वात पहिले कारण म्हणजे कुत्रे तेव्हाच ओरडतात किंवा हाऊल करतात जेव्हा त्यांना आपल्या साथीदारांना संदेश पाठवायचा असतो. रात्रीच्या अंधारात या विशिष्ट आवाजाच्या मदतीने ते आपल्या सोबत्यांना आपली लोकेशन सांगतात. काही शास्त्रज्ञ असेही मानतात की जेव्हा कुत्र्यांना काहीतरी त्रास होतो तेव्हा ते रडतात आणि हाऊल करतात. कुत्र्याला मनुष्यासोबत मिळून मिसळून राहायला आवडते परंतु जेव्हा रात्री त्याला कोणीही दिसत नाही तेव्हा तो ओरडायला लागतो. एकटेपणा हे देखील त्यांच्या हाऊलिंग मागील प्रमुख कारण असू शकते.


कुत्रा पाळणे आणि कुत्रा प्रजाती

Dog पाळणे म्हणजे तुमच्या संरक्षणाचे वचन आणि सोबतच एकटेपणापासून मुक्तता होय. संशोधनातून सिद्ध झाले आहे की डिप्रेशन दूर करण्यासाठी कुत्रा खूप उपयुक्त ठरतो. परंतु बऱ्याच लोकांना शंका असते की कोणता कुत्रा पाळावा आणि त्याची कश्या पद्धतीने काळजी घ्यावी. तर चला आता पाहूया कुत्रा पालन बद्दल महत्त्वाची माहिती...


योग्य कुत्र्याची निवड

कुत्रा पाळण्याआधी तुम्हाला कोणत्या ब्रीड चा कुत्रा आवडतो याची निवड करणे आवश्यक आहे. जर तुम्ही फ्लॅट मध्ये राहत असाल किंवा तुमचे घर आकाराने लहान असेल तर ग्रेट डेन, मैसटिफ (नेपोलियन, इंग्लिश, बुल, स्पैनिश, अल्पाइन इत्यादी), सेंट बर्नार्ड इत्यादी ब्रीड न पाळण्याची सल्ला दिली जाते. 

याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुत्र्यावरील खर्च होय. कुत्रा पाळण्याआधी स्वतःला विचारा की तुम्ही त्याच्यावर किती खर्च करू शकतात. कारण लहान कुत्र्यांच्या मानाने मोठ्या कुत्र्यांचा आहार जास्त असतो. आणि अश्या कुत्र्यांची खरेदी व काळजी दोघेही महाग पडतात. 


कोणता कुत्रा पाळावा

जर तुम्हाला फक्त शो बाजी म्हणजेच इतरांना दाखवण्यासाठी कुत्रा हवा असेल तर आयरिस सेटर, पूडल, मिनटन, शिहत्जू, चिवावा, पग जसा टॉय डॉग इत्यादी कुत्रे तुम्ही पाळू शकतात. 

जर तुम्ही आपल्या लहान मुलांची सुरक्षितता आणि त्यांना खेळण्यासाठी कुत्रा आणत असाल तर बॉक्सर, लेब्राडोर, पग, बीगल, लासा, डालमेशंस या काही प्रजाती तुमच्यासाठी उत्तम ठरतील. 

याशिवाय जर तुम्हाला घराच्या किंवा आपल्या प्रॉपर्टी च्या सुरक्षितता साठी कुत्रा हवा असेल, तर या प्रजातीतील कुत्र्यांना दोन भागात विभाजित केले गेले आहे. 


1) वॉच डॉग : वॉच डॉग एखाद्या डोअर बेल प्रमाणे काम करतात. जर काही संकट आले असेल तर ही कुत्री आवाज देऊन मालकाला अलर्ट करतात. वॉच डॉग कॅटेगरी मध्ये बॉक्सर, लेब्राडोर, पग, बीगल, लासा, डालमेशंस इत्यादींचा समावेश आहे.


2) गार्ड डॉग : गार्ड डॉग हे घराच्या सुरक्षिततेसाठी एकटेच परिपूर्ण असतात. हे कुत्रे शरीराने खूप ताकतवान असतात व वेळप्रसंगी मालकासाठी प्राणही देतात. बॉक्सर, लेब्राडोर, पग, बीगल, लासा, डालमेशंस ह्या काही प्रसिद्ध गार्ड डॉग प्रजाती आहेत.


तर मित्रांनो ही होती कुत्रा मराठी माहिती मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरली असेल. तुम्हाला Dog information in Marathi कशी वाटली मला कमेन्ट करून सांगा. धन्यवाद 


Read More 


EmoticonEmoticon