Friday, 27 October 2023

जाहिरात लेखन मराठी नमूना | Advertisement Writing in Marathi

जाहिरात लेखन मराठी  9वी व 10वी - Jahirat Lekhan in Marathi 

मित्रांनो आजकाल कोणत्याही वस्तूची विक्री वाढवण्यासाठी तिच्या योग्यते सोबतच जाहिराती वर देखील भर दिला जातो. प्रत्येक उत्पादक आपल्या वस्तूची जास्तीत जास्त विक्री करून फायदा मिळवू इच्छितो. परंतु ही विक्री वाढवण्यासाठी केली जाणारी जाहिरात लेखन ही देखील एक कला आहे. 

आजच्या लेखात आपण जाहिरात लेखन काय आहे ? व जाहिरात लेखन कसे करावे याबद्दलची माहिती प्राप्त करणार आहोत. जाहिरात लेखन मराठी 9वी व 10वी (Advertisement Writing in Marathi) मधील विद्यार्थ्यांना विशेष करून विचारले जाते. म्हणून आपण हे जाहिरात लेखन व्यवस्थित अभ्यासा.


जाहिरात म्हणजे काय ?

कोणत्याही वस्तू अथवा सेवेच्या विक्रीसाठी तिची माहिती आकर्षक पद्धतीने लोकांसमोर ठेवणे म्हणजेच जाहिरात करणे होय. जाहिरात बनविण्याचा प्रमुख उद्देश आपली वस्तू लोकांच्या नजरेत आणून तिची जास्तीत जास्त विक्री करणे हा असतो. तुम्ही रस्त्यावरील बॅनर, वर्तमानपत्र, मोबाईल फोन व टीव्ही मध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या जाहिराती पाहिल्या असतील. या जाहिरात खाण्याच्या वस्तू पासून तर परिधान करण्याच्या कपड्यांपर्यंतच्या असतात. 


जाहिरात लेखन कसे करावे  - Jahirat Lekhan in Marathi

जाहिरात लेखन करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात-

  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जाहिरात आकर्षक असायला हवी
  • जाहिरात कमी शब्दात अधिक प्रभावशाली असायला हवी.
  • जाहिरातीत स्लोगन व घोषवाक्य यांचा उपयोग करायला हवा.
  • आकर्षक चित्रे वापरायला हवेत.
  • जाहिरातीचा सुरुवातीला लक्ष वेधून घेणारे शब्द वापरावेत जसे खुशखबर, धमाकेदार सेल, एकावर एक फ्री, आधी या आधी मिळवा, 70% सूट इत्यादी.
  • चौकोनी बॉक्स, वर्तुळ व इतर चित्रांचा वापर करावा.
  • जाहिरात ही नेहमी एका चौकोनी बॉक्समध्ये तयार करावी.
  • जाहिरातीच्या शेवटी मोबाईल नंबर किंवा दुकानीचा फोन नंबर द्यावा. 


मराठी जाहिरात लेखन नमुना - Advertisement Writing in Marathi

पुढे आम्ही आपणास जाहिरातीचे काही नमुने देत आहोत. ह्यांना अभ्यासून आपण आपल्या पद्धतीने जाहिरात लिहू शकतात.


1) आइस क्रीम पार्लर जाहिरात लेखन

जाहिरात लेखन मराठी


अनुभवा उन्हाळ्यातील गारवा

मोहन आईस्क्रीम पार्लर


आमच्या येथे उपलब्ध आईस्क्रीम चे प्रकार

  • मलई आईस्क्रीम 
  • चिकू 
  • आंबा 
  • अननस 
  • चॉकलेट 
  • अमेरिकन ड्रायफ्रूट


विशेष ऑफर: ₹ 200 च्या आईस्क्रीम खरेदीवर मिळवा दोन आईस्क्रीम कोन मोफत!


त्वरा करा आजच दुकानाला भेट द्या आणि मिळालेल्या संधीचा लाभ घ्या..!


आमचा पत्ता:

मोहन आईस्क्रीम पार्लर, मेन रोड, पुणे

मो. 8758XXXXXX

ईमेल: mohanicecream11@gmail.com


2) साबणाची जाहिरात लेखन



3) छत्री ची जाहिरात लेखन




तर मित्रांनो ह्या लेखात आपण जाहिरात लेखन मराठी - marathi jahirat lekhan व जाहिरात लेखन मराठी (Advertisement Writing in Marathi9वी आणि 10वी ची माहिती मिळवली. आशा करतो की हे मराठी जाहिरात लेखन आपणास उपयोगी ठरले असेल आणि ह्या लेखाला वाचल्यानंतर आपणही योग्य जाहीरात लिहू शकाल. जर आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेन्ट करून नक्की विचारा. धन्यवाद.. 


EmoticonEmoticon