स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध। Swachata Che Mahatva Essay in Marathi
स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी - Swachata che mahatva: आज आपल्या देशात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात सुरू आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोंबर 2014 ला स्वच्छतेचे महत्त्व जाणून स्वच्छ भारत अभियान सुरू केले. संत गाडगेबाबां सारख्या महान संतांनी देखील स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे.
आजच्या या लेखात आपण स्वच्छतेचे महत्व व स्वच्छ भारत अभियान या विषयावर Swachata che mahatva nibandh मराठी निबंध प्राप्त करणार आहोत.
1) स्वच्छतेचे महत्त्व निबंध मराठी - Swachata Che Mahatva Nibandh
(300 words)
स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, स्वच्छतेचे पालन सर्वांना करणे आवश्यक आहे. स्वच्छता बऱ्याच प्रकारची असू शकते जसे सामाजिक, व्यक्तिगत, वैचारिक इ. आपण प्रत्येक क्षेत्रात स्वच्छतेचे पालन करायला हवे. विचारांची स्वच्छता आपल्याला एक चांगला व्यक्ती बनवते, व्यक्तिगत स्वच्छता आपल्याला रोगापासून वाचवते. म्हणून स्वच्छतेसाठी आपल्याला नेहमी कार्यरत राहायला हवे.
व्यक्ती लहान असो किंवा मोठा, प्रत्येक वयात स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असते. जसे जेवणाच्या आधी हात धुणे, दररोज अंघोळ करणे, दातांची स्वच्छता ठेवणे, खाली तसेच उघळ्यावर पडलेल्या वस्तू न खाणे, घराला स्वच्छ ठेवणे, घरात सूर्यप्रकाश तसेच हवा खेळती राहू देणे, वाढलेली नखे कापणे आणि स्वच्छ करणे, घरच नाही तर आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवणे, शाळा कॉलेज इ. सार्वजनिक स्थानावर कचरा न फेकणे इत्यादी गोष्टी स्वच्छतेसाठी आवश्यक आहेत. नेहमी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा. या सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्यांचे पालन करून आपण आपली स्वच्छता ठेवू शकतो.
स्वच्छतेचे भरपूर फायदे आहेत जसे स्वच्छतेची सवय आपल्याला खूप साऱ्या रोगांपासून संरक्षित ठेवते. कोणताही रोग शरीराला अपायकारक तर असतोच पण या सोबत दवाखान्याचा खर्च देखील वाढवतो. खराब पाणी आणि अन्न खाल्याने पिलिया, टायफॉइड, कॉलेरा सारखे रोग होतात. जास्त वेळ पडलेल्या खराब पाण्यात डास वाढायला लागतात. जे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या रोगांना आमत्रण देतात.
व्यर्थ रोगांना वाढवण्या पेक्षा चांगले आहे की आपण स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे व स्वच्छतेचे नियम पाळायला हवेत. व्यक्तिगत स्वच्छता सोबत वैचारिक स्वच्छता पण खूप महत्त्वाची आहे. विचारांची स्वच्छता असेल तर आपण एक चांगले व्यक्ती बनतो. असा व्यक्ती स्वतःच्या विकासासोबत समाजाचा सुद्धा विकास करतो.
भारत सरकारने स्वच्छतेचे महत्व समजून स्वच्छ भारत नावाचे अभियान पण सुरू केले आहे. या अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2014 ला गांधी जयंती च्या दिवशी झाली होती. पण फक्त सरकारच्या प्रयत्नाने कोणतेही अभियान सफल होत नाही, या साठी जनतेची पण साथ लागते. म्हणून नागरिकांना मिळून स्वच्छतेचे पालन करायला हवे व जास्तीत जास्त लोकांना स्वच्छते विषयी जागृत करायला हवे.
***
2) स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | Swachata che mahatva Nibandh
(200 words)
स्वच्छता ही आपली सवय बनायला हवी. चांगले पर्यावरण आणि संस्करासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी शरीराची स्वच्छता आवश्यक आहे. सामाजिक आणि वैचारिक स्वास्थासाठी आजूबाजूच्या पर्यावरणाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे.
घाण ही खूप साऱ्या प्राणघातक रोगांना आमंत्रण देते. वेगवेगळे बॅक्टेरिया आणि व्हायरस स्वच्छतेतून निर्माण होतात. म्हणून आपण सर्वांना नियमित रूपाने शरीर व आपल्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता करायला हवी. जेवण करण्या आधी हातांना स्वच्छ धुवायला हवे. कपडे सुद्धा स्वच्छ व नीटनेटके परिधान करायला हवेत. स्वच्छता ही आत्मविश्वासा सोबत आत्मसन्मान देखील वाढवते. स्वच्छ आणि नीटनेटकी जीवनपद्धती साठी स्वच्छता ही फार उपयुक्त आहे.
स्वच्छता ठेवण्याने जीवनात आनंद वाढतो. जे देश स्वच्छ असतात तिथे पर्यटन वाढते आणि देशाचा आर्थिक विकास होतो. आपण सर्वांनी स्वच्छतेला एक जन आंदोलन बनवायला हवे. आपल्या सभोवतालच्या लोकांना जागृत करून स्वच्छतेचे महत्त्व समजवायला हवे. स्वच्छतेला आपली सवय बनवल्याने खूप सार्या नकारात्मक प्रभावापासून आपण वाचू शकतो.
स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वच्छता ही सभ्य आणि सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे. म्हणून आपण सर्वांनी शपथ घ्यायला हवी की स्वच्छता ठेवून आपल्या समजला सभ्य बनवू.
***
स्वच्छता मराठी घोषवाक्य | Swachata Ghosh Vakya in Marathi
- स्वच्छ भारत, स्वस्थ भारत
- स्वच्छतेचे दीप लावा, चारही बाजूंना उजळ पसरवा.
- नखे कापा बोटाची, नाही होणार व्याधी पोटाची.
- स्वच्छते विषयी तुमची कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती.
- स्वच्छता म्हणजे रोजचा सन नाहीतर कायमचे आजारपण.
- रोज काढा केर, विषाणूंना करा ढेर.
- करूया असे काम, बनलेली राहील देशाची शान
- चला स्वच्छते बद्दल बोलूया, अधिकाधिक लोकांना जागृत करूया.
- पृथ्वी, पाणी, हवा ठेवा साफ, नाहीतर येणारी पिढी करणार नाही माफ.
- एक पाऊल स्वच्छते कडे.
- स्वच्छतेची ठेवा जाण, स्वच्छतेने बनेल देश महान.
- स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे.
स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी विडियो पहा:
swachata che mahatva nibandh : तर मित्रांनो हा होता स्वच्छतेचे महत्व याविषयावरील मराठी निबंध. या लेखातील swachata che mahatva, Cleanliness Marathi information and essay ही माहिती आपण आपल्या शाळा तसेच कॉलेज च्या अभ्यासात उपयोगात घेऊ शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
EmoticonEmoticon