Monday 31 October 2022

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र | Letter to Best Friend on Birthday in Marathi

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र - Letter to Best Friend on Birthday in Marathi

उत्तम पत्र लेखन करणे ही एक कला असते. पत्र हे एक असे माध्यम आहे ज्याच्या द्वारे दूर असलेल्या व्यक्ति शी संपर्क केला जाऊ शकते. आपले विचार दूर असलेल्या व्यक्तीला पाठवले जाऊ शकतात. आज जरी पत्र लिहिणे आणि पत्र पाठवणे कमी झाले असले तरी पत्र लेखन ही अजूनही एक प्रभावशाली पद्धती आहे. आणि म्हणून आजही शाळा कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना पत्र लेखनाचा सराव करण्याचे शिकवले जाते. 

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र कसे लिहावे व मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या पात्राचे नमुने घेऊन आलेलो आहोत. या लेखातून अभ्यास करून आपण मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र कसे लिहावे याबद्दल ची माहिती प्राप्त करू शकतात.


मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र

नमूना 1)

गांधी बंगला
रामपुर
दिनांक 31-10-2022


प्रिय मित्रा 
सप्रेम नमस्कार


पुढच्या आठवड्यात तुझ्या वाढदिवस आहे हे ऐकून मला अति आनंद झाला. तुला तुझ्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे पुढील आठवड्यात माझ्या शाळेच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. आणि म्हणून या दरम्यान मी घरी येणार आहे. तुझ्या वाढदिवशी मी तुझ्यासोबत राहील या गोष्टीचा मला आनंद आहे. याशिवाय तुला ऐकून आनंद होईल की मी तुला वाढदिवशी एक सुंदर भेट देखील आणणार आहे. मी दिलेली वाढदिवसाची भेट तुला नक्कीच आवडेल. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा व हा वाढदिवस तुझ्या जीवनात आनंदाचा संचार करो हीच माझी प्रार्थना. 


काका काकूंना माझ्या नमस्कार सांगा व आपल्या इतर उरलेल्या गोष्टी प्रत्येक्ष भेटल्यावर करुया.


तुझा प्रिय मित्र
मोहित


नमूना 2)

छत्रपती शिवाजी महाराज चौक
पुणे
दिनांक : 31-10-2022


प्रिय मित्रा ओम

आशा आहे की तुझ्या कुटुंबात सर्वजण आनंदी असतील. मला माहित आहे की येत्या पाच दिवसात तुझा वाढदिवस येतो आहे. आणि म्हणूनच मी तुला हे पत्र लिहीत आहे. प्रिय मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला माहित पडले की तू दरवर्षाप्रमाणे या वर्षी देखील वाढदिवसाची प्रशस्त पार्टी देणार आहे. तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीत सामील होण्याची माझी फार इच्छा होती. परंतु उद्या पासून माझ्या शाळेच्या परीक्षा सुरू होत असून पुढील 15 दिवस चालणार आहेत. तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीत येण्याची माझी तीव्र इच्छा होती. परंतु परीक्षे मुळे मी येऊ शकत नाही. आपण पुढील वर्षी नक्कीच सोबत वाढदिवस साजरा करू.


माझ्याकडून तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. तुझ्या वाढदिवशी न येऊ शकल्याबद्दल क्षमा असावी. काका काकांना माझा प्रणाम. 


तुझ्या प्रिय मित्र
मोहित


तर मित्रहो या लेखात आम्ही आपल्यासाठी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र सामील केले आहेत. आशा आहे आपणास हे Letter to Best Friend on Birthday in Marathi उपयोगी ठरले असतील. हा लेख आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनाही ही माहिती प्राप्त होईल. धन्यवाद.. 


EmoticonEmoticon