Friday 14 October 2022

धनत्रयोदशी चे महत्व व मराठी माहिती | Dhantrayodashi information in Marathi

धनत्रयोदशी चे महत्व व धनत्रयोदशी माहिती मराठी 

आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये आरोग्यम् धनसंपदा असा उल्लेख करण्यात आलेला आहे. याचा अर्थ होतो आरोग्य हेच धन आहे. उत्तम आरोग्य हे कोणत्याही धन संपत्ती पेक्षा श्रेष्ठ आहे. याचेच महत्त्व पटवून देण्यासाठी दिवाळीच्या दोन दिवसाआधी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. आजच्या या लेखात आम्ही आपल्या सोबत धनत्रयोदशी चे महत्व व धनत्रयोदशी सणाची मराठी माहिती शेअर करणार आहोत.


धनत्रयोदशी चे महत्व


धनत्रयोदशी चे महत्त्व - Importance of Dhantrayodashi in Marathi

धनत्रयोदशीच्या सणाला हिंदी भाषेत धनतेरस म्हणूनही ओळखले जाते. हिंदू कॅलेंडर नुसार धनतेरस कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला साजरी केली जाते. हा दिवस दिवाळी सणाच्या दोन दिवसाआधी येतो. 


धनत्रयोदशी हा शब्द दोन शब्दांपासून मिळून बदलेला आहे पहिले धन आणि दुसरे त्रयोदशी. यातील धन म्हणजे समृद्धी आणि त्रयोदशी म्हणजे तेरावा दिवस. धनत्रयोदशी म्हणजे आपल्या धन समृद्धीला तेरा पट वाढवणे होय. व्यापारी वर्गासाठी तंत्र देशाचे महत्व विशेष असते कारण धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी भगवान ची पूजा आराधना केल्याने उत्तम आरोग्या सोबत धनसंपत्तीची देखील प्राप्ती होते. 


पौराणिक कथेनुसार समुद्रमंथना दरम्यान कार्तिक कृष्ण त्रयोदशीला भगवान विष्णूचे अवतार भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी यांना भगवान विष्णूच्या रूपातच पुजले जाते. मान्यता आहे की भूतलावर चिकित्सा विज्ञान चे प्रचार प्रसार करण्यासाठी भगवान धन्वंतरी यांनी अवतार घेतला. चिकित्साचे गुरु भगवान धन्वंतरी यांच्या प्रकट दिनानिमित्त धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. शास्त्रांमध्ये देखील धनत्रयोदशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी देवी लक्ष्मी यांना भगवान धन्वंतरींसोबत पुजले जाते. याशिवाय धन संपत्ती चे देवता कुबेर यांनी देखील पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीचे भांडे खरेदी करणे विशेष शुभ मानले जाते. म्हणून अनेक लोक यादिवशी सोने खरेदी करतांना दिसतात. धनत्रयोदशी चे महत्व


वाचा> दिवाळी निबंध मराठी


धनत्रयोदशीची पूजा कशी करावी ?

धनत्रयोदशी चे महत्व आपण जाणले आता धनत्रयोदशी ची पूजा कशी करावी याविषयी जाणून घेऊया. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान गणेश, देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर या देवांची पूजा केली जाते. सध्या समय प्रदोष काळात पूजा करणे शुभ मानले जाते.


  1. पूजेसाठी सर्वात आधी स्वच्छ कपडे परिधान करावेत.
  2. यानंतर एक स्वच्छ पिवळा अथवा लाल रंगाचा कापड टाकून त्यावर देवी लक्ष्मी, गणेश, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांना स्थापन करावे. 
  3. यानंतर पूजेला सुरुवात करावे सर्वात आधी श्री गणेशांचे पूजन करावे. गणेशाला पुष्प, दुर्वा इत्यादी अर्पण करून प्रणाम करावे.
  4. यानंतर हातात अक्षत घेऊन भगवान धन्वंतरीचे चिंतन करा.
  5. आता भगवान धन्वंतरीला पंचामृताने स्नान करून, चंदनाने टिळा लावून त्यांना पिवळी फुले अर्पण करा.
  6. फुले अर्पण केल्यानंतर, फळे आणि नैवेद्य अर्पण करावे. भगवान धन्वंतरीच्या मंत्रांचा उच्चार करा आणि त्यांच्यासमोर तेलाचा दिवा लावा.
  7. यानंतर धनत्रयोदशीची कथा वाचून आरती करावी
  8. आता भगवान धन्वंतरीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा आणि देवी लक्ष्मी आणि कुबेरजींची पूजा करा.
  9. पूजा संपवून घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तेलाचे दिवे लावावेत.

Dhantrayodashi information in Marathi या वरील लेखात आम्ही आपल्यासोबत धनत्रयोदशी चे महत्व व धनत्रयोदशी माहिती मराठी मध्ये शेअर केलेली आहे. याशिवाय धनत्रयोदशी पूजा विधि काय आहे आणि धनत्रयोदशी पूजा कशी करावी याविषयी सविस्तर माहिती वरील लेखात देण्यात आलेली आहे. आम्ही आशा करतो ही सर्व माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. हा लेख इतरांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद


EmoticonEmoticon