Friday, 11 February 2022

पु ल देशपांडे यांची माहिती मराठी | Pu la Deshpande Information in Marathi

पु ल देशपांडे यांची माहिती मराठी व पुस्तकांची नावे | Pu la Deshpande information  & Biography in Marathi

आपल्या महाराष्ट्राच्या मातीने या देशाला भरभरून दिलं, याच महाराष्ट्राच्या मातीने अशी काही रत्न जगाला दिली, ज्यांची आठवण आजही काढली जाते व इथून पुढचे शंभर वर्ष देखील काढली जाईल यात दुमत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका अवलिया बद्दल सांगणार आहोत, ज्याचे आयुष्य म्हणजे फक्त लोकांचं निखळ मनोरंजन...!!


 महाराष्ट्राचे लाडके असलेले, वक्तृत्वावर उत्तम पकड असलेले, नाटककार, संगीतकार, उत्तम अभिनय करणारे, ज्यांचं विनोदी वांग्मय अवघ्या महाराष्ट्राला आजही खळखळून हसायला भाग पाडतं, असे एकमेव अवलिया, आपल्या सर्वांचे लाडके भाई, म्हणजेच पद्मभूषण “ पु. ल. देशपांडे". 


या लेखात आम्ही आपल्यासमोर  Purushottam Laxman Deshpande अर्थात पु ल देशपांडे यांची माहिती मराठी - Pu la Deshpande Information in Marathi जाणून घेणार आहोत. 


पु ल देशपांडे यांची माहिती मराठी


 पु ल देशपांडे यांची माहिती मराठी व जीवन परिचय (Pu la Deshpande Information in Marathi) :-

 पु.ल.देशपांडे यांचे पूर्ण नाव "पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे"  आहे. 8 नोव्हेंबर 1919 रोजी पु.ल. यांचा जन्म मुंबईतील गावदेवी परिसरात झाला. पण त्यांचे बालपण जोगेश्वरी मधील सारस्वत कॉलनी मध्ये बहरले. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण हे पार्ले टिळक विद्यालयात झालं. पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले, व पुण्यातील सुप्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेज आणि सांगली मधील विलिंग्डन कॉलेज येथे त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले.

 

 लहानपणापासूनच पु.ल. अगदी धष्टपुष्ट होते, वयाच्या दुसऱ्या वर्षी सुद्धा ते पाच वर्षाच्या मुला एवढे दिसत असत.


 पु.लं. यांचे वडील “ अडवाणी " कागद कंपनीमध्ये फिरते विक्रेते होते त्याचबरोबर त्यांची आई गृहिणी होती. एकदा पु.लं. यांच्या आजोबांनी स्वतः लिहिलेलं एक भाषण पुलंना पाठ करून बोलून दाखवायला सांगितलं . तेव्हा पुलं यांचं वय अवघं 5 वर्ष होतं . 

 

छोट्या पुलंनी ही जबाबदारी स्वीकारली, मी काहीच वेळात भाषण पाठ करून हातवारे करून, बोलून देखील दाखवलं. पुलंच वकृत्व पाहून त्यांचे आजोबा देखील चाट पडले.  पु लं च्या घरी संगीताची आवड सगळ्यांना होती. आणि म्हणूनच संगीताचे देखील बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. त्यांच्या आजोबांना पेटी वाजवताना बघून पुलं सुद्धा अगदी लहान वयातच पेटी वाजवायला शिकले.


 त्यांचा पेटीवर एवढा हात बसला होता की एकदा बालगंधर्व यांच्यासमोर त्यांना पेटी वाजवण्याची संधी मिळाली होती, व लहान पु.लं. ना पेटी वाजवताना बघून स्वतः बालगंधर्वांनी देखील त्यांना शाबासकी दिली व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


 वयाच्या बाराव्या वर्षापासून पुलं स्वतः भाषणे लिहायला लागले.  बऱ्याच वेळा ही भाषणं पु. लं. स्वतः लिहून सादर करत तर कधीकधी इतर लोकांना देखील ही भाषण लिहून देत असत.  लहानपणापासूनच पु.ल. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करायचे, आजूबाजूचे लोक, घरात आलेले नातेवाईक, यातील जर त्यांना कोणी हास्यास्पद वाटलं तर ते त्यांची नक्कल करायचे. आणि ही गोष्ट बऱ्याच जणांना खटकायची सुद्धा. नक्कल करता करता त्यांनी यानंतर विनोदी लिखाण करायला सुरुवात केली.


 पु ल देशपांडे यांच्या कारकिर्दीची सुरुवात (Pu la Deshpande Life Story) :-

 पुलं लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. यानंतर त्यांनी पेटी आणि संगीत शिकवण्याचे काम करून आपले घर चालवले.  यानंतर त्यांनी बऱ्याच कवितांना चालबद्ध केले. Pu la Deshpande Information in Marathi

 

 महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतानाच राज बडे यांच्या  “ माहेरा जाते " या सुप्रसिद्ध कवितेला त्यांनीचं चाल लावली होती. “ इंद्रायणी काठी " या ग दि माडगूळकर यांच्या कवितेला आणि पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या गाण्याला सुद्धा पु. लं. यांनी चाल लावलेली आहे.


 काही काळासाठी त्यांनी पेट्रोल रेशनिंगच्या दुकानात देखील काम केलं. यानंतर एल एल बी करून कलेक्टर कचेरीत देखील काही काळ काम केलं. त्याचबरोबर ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी देखील त्यांनी केली होती. 

 

 पुण्यामध्ये त्यांचं बी.ए. आणि एम.ए.चे शिक्षण पूर्ण झालं. आता हळूहळू एक उत्तम नाटककार, संगीतकार, आणि अभिनेता म्हणून ते उदयास येऊ लागले होते.


 त्या वेळेस प्रसिद्ध असलेल्या नभोवाणी वरती आता पुलंच्या नाटिकेचे भाग सादर व्हायला लागले होते. पैजार या अनंत काणेकरांच्या श्रुतीकेचा पु ल देशपांडे देखील भाग होते.     

 

   “ अभिरुची " या त्यांच्या पहिल्या नियतकालिकेतून त्यांनी पहिले व्यक्तिचित्र प्रसिद्ध केले ज्याचं नाव होतं “:भैय्या नागपूरकर ". 1948 साली त्यांनी तुका म्हणे आणि बिचारे सौभद्र ही नाटके लिहिली. यानंतर “ जीन आणि गंगा   कुमारी "  या  त्यांनी लिहिलेल्या लघुकथेने वाचक रसिकांचे लक्ष वेधून घेतलं, आणि पुलं लेखक सुद्धा बनले.


 पु ल देशपांडे यांची चित्रपटातीलं कारकीर्द :-

 1947 सालापासून पु ल देशपांडे यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. अनेक गाण्यांना चाली लावल्या, संगीतबद्ध केले. आजवर सर्व रसिकप्रेक्षकांना माहीती असलेला सबकुछ पुलं म्हणून प्रसिद्ध असलेला  “ गुळाचा गणपती " हा चित्रपट देखील याच काळात प्रदर्शित झाला.

 

 या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दर्शवली. “ वंदे मातरम " या 1948 साली आलेल्या चित्रपटामध्ये पुलंनी अष्टपैलू कामगिरी केली. “ देव बाप्पा "  या चित्रपटामध्ये पु. ल. देशपांडे यांची प्रमुख भूमिका होती आणि या चित्रपटातील ग दि माडगूळकर यांनी  रचलेलं बालगीत म्हणजेच “ नाच रे   मोरा " हे अजरामर झालं ज्याला चालबद्ध स्वतः पु ल देशपांडे यांनी केलं होतं.

 

 दूध भात, देव पावला, घरधनी, चोखामेळा, नवरा बायको, मोठी माणसं, इत्यादी अनेक चित्रपटांचे लेखन, अभिनय, संगीत इत्यादी त्यांनी केलं. 


 नाटक आणि चित्रपटांमधून ते आपला ठसा उमटवत होतेच, त्याचबरोबर नभोवाणी व दूरचित्रवाणी या प्रसारमाध्यमांवर  देखील त्यांनी स्वतःच कौशल्य दाखवून दिलं. 1955 साली ते  All India Radio मध्ये कामाला लागले. 


अनेक अफलातून भाषणे आणि सुप्रसिद्ध श्रुतिका त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर दिल्या.  1957 साली त्यांची प्रमुख नाट्यनिर्माते म्हणून आकाशवाणीवर बढती झाली. आणि म्हणूनच त्यांना दिल्लीला जावे लागले. 


आपल्या पत्नीसह पुलं यांनी दिल्लीमध्ये गडकरी दर्शन हा कार्यक्रम सादर केला आणि येथेच लोकप्रसिद्ध संपूर्ण महाराष्ट्राला आजही भावत असलेल्या “बटाट्याची चाळ" या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला.


 Media of mass communication च्या अभ्यासासाठी आकाशवाणी तर्फे ते लंडनला देखील गेले, तिथून आल्यानंतर दूरचित्रवाणीचे  ते निर्माता बनले. दूरदर्शन या चैनल वरून त्यांनी बिर्जू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम सादर केला, ज्यामध्ये तबल्याची साथ स्वतः पु ल देशपांडे यांनी दिली होती. 

 

दूरदर्शन वरील पहिले प्रसारण म्हणजेच भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची मुलाखत होती, आणि त्यांची मुलाखत घेणारे पु ल देशपांडे हे पहिले मुलाखतकार ठरले.


 ती फुलराणी, सुंदर मी होणार, असा मी असा मी, तीन पैशाचा तमाशा, बटाट्याची चाळ,  इत्यादी अनेक लोकनाट्य, विनोदी कथा याबरोबरच अपूर्वाई, जावे त्यांच्या देशा ही प्रवासवर्णने एक शून्य मी, अघळ पघळ, आपुलकी,उरलंसुरलं, नसती उठाठेव, हसवणूक, इत्यादी अनेक विषयांवर लिहिलेली पुस्तके पु लं यांच्या उत्तम लेखनशैलीला दर्शवतात.


 पु ल देशपांडे यांचे वैयक्तिक आयुष्य :-

 वैयक्तिक आयुष्यात देखील पुलं अत्यंत साधेपणाने राहत असत. पु.लं. ची पहिली पत्नी लग्नानंतर काहीच महिन्यात वारली यानंतर पुलंनी 1946 साली दुसरा विवाह सुनीता ठाकूर यांच्याशी केला. ज्यांनी नंतर सुनीता देशपांडे म्हणून  बरेच नाव कमावले.


 पुलं यांना  त्यांच्या हजरजबाबीपणामुळे देखील ओळखलं जायचं. जेंव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शिगेला पोहोचली होती, त्यावेळेस पुलंनी एक लेख लिहिला ज्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की  “ मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला “च "  पाहिजे " , यावर शंकरराव चव्हाण पुलंना बोलले की तुम्ही एवढा " च " वर जोर का देत आहात? यावर पु.लं उत्तरले तुमच्या आडनावातील " च " काढून टाकला तर काय राहिलं ? यानंतर पुलंचा हजरजबाबीपणा बघून शंकरराव चव्हाण यांना माघार घ्यावी लागली. 


 बाळासाहेब ठाकरे स्वतः पुलंना म्हणायचे की मी जर चित्रांचा व्यंगकार आहे तर पु लं शब्दांचे व्यंगकार आहेत. शाब्दिक भांडणांमध्ये पुलंचा हात कोणीच धरू शकत नव्हतं. त्यामुळे या बाबतीत तरी त्यांच्या नादाला कोणीच लागत नसे. 


 पु ल देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार (Pu la Deshpande Awards in Marathi ) :-

 वेळोवेळी प्रेक्षकांनी पुलं यांच्या कार्यावर भरभरून प्रेम केलं. त्यांच्या नाट्य प्रयोगाला लोकं तीन-तीन तास रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करत असत. आणि त्यांच्या अनमोल कार्याला मिळालेली हीच खरी पोचपावती होती. पु ल देशपांडे यांना पद्मश्री सन्मान,महाराष्ट्र भूषण,साहित्य अकादमी,महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार, इत्यादी अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

 

आपल्या लेखणीतून, नाटकातून, अभिनयातून, संगीतातून, मायबाप रसिक प्रेक्षकांचे निव्वळ मनोरंजन करणारा असा अवलिया होणे पुन्हा नाही. आणि असं हे धगधगते वादळ 12 जून 2000 साली कायमचं शांत झालं. व आपल्या सर्वांचे लाडके भाई म्हणजेच पु ल देशपांडे हे स्वर्गातील देवांना हसवण्यासाठी कायमचे रुजू झाले. 


पु. ल. देशपांडे यांची पुस्तकांची नावे - Purushottam Laxman Deshpande Books

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी आपल्या जीवनकाळात भरपूर लिखाण केले. त्यांच्या लिखाणाची सर्वच वयोगटातील वाचकांद्वारे प्रशंसा करण्यात आली. काही प्रसिद्ध पु ल देशपांडे यांची पुस्तकांची नावे व पुस्तकांची यादी पुढील प्रमाणे आहे-
  1. आम्ही लटके ना बोलू
  2. सुंदर मी होणार
  3. रवींद्रनाथ : तीन व्याख्याने
  4. वंग-चित्रे
  5. मित्रहो!
  6. श्रोतेहो !
  7. मोठे मासे छोटे मासे
  8. काय वाट्टेल ते होईल
  9. भावगंध
  10. कोट्याधीश पुल
  11. एक झुंज वार्‍याशी
  12. गुण गाईन आवडी
  13. पु.ल.: एक साठवण
  14. रसिकहो !
  15. तुझे आहे तुजपाशी
  16. वटवट वटवट
  17. अंमलदार
  18. टेलिफोनचा जन्म
  19. मुक्काम शांतिनिकेतन
  20. एका कोळीयाने
  21. अपूर्वाई
  22. दाद
  23. गणगोत
  24. पुरचुंडी
  25. हसवणूक
  26. मैत्र
  27. व्यक्ती आणि वल्ली
  28. खिल्ली
  29. चार शब्द
  30. अघळ पघळ
  31. जावे त्यांच्या देशा
  32. आपुलकी
  33. उरलंसुरलं
  34. कान्होजी आंग्रे
  35. पोरवय
  36. असा मी असामी
  37. खोगीरभरती
  38. गोळाबेरीज
  39. मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास
  40. पूर्वरंग
  41. वयम मोठम खोटम
  42. विठ्ठल तो आला आला
  43. तीन पैशाचा तमाशा
  44. तुका म्हणे आता
  45. ती फुलराणी
  46. नवे गोकुळ
  47. पुढारी पाहिजे
  48. भाग्यवान
  49. गाठोडं
  50. द्विदल
  51. एक शून्य मी
  52. नस्ती उठाठेव
  53. पाचामुखी
  54. बटाट्याची चाळ

मित्रहो आज आपण पु ल देशपांडे यांची माहिती मराठी | Pu la Deshpande Information in Marathi जाणून घेतील. या लेखाद्वारे आम्ही पुल देशपांडे यांचा जवळ जवळ संपूर्ण जीवनप्रवास लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कंमेंट मध्ये कळवा. आणि अजून कोणत्या थोर व्यक्तींबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला सांगा. 

धन्यवाद...!


अधिक वाचा :



EmoticonEmoticon