Thursday, 10 February 2022

मातृभाषेचे महत्व मराठी निबंध | Matru Bhasheche Mahatva Nibandh Marathi

मातृभाषेचे महत्व निबंध मराठी : मराठी ही महाराष्ट्र राज्याची मातृभाषा आहे. आज जगभरात करोडो लोक असे आहेत ज्यांची मातृ भाषा मराठी आहे. व्यक्तीवर योग्य संस्कार होण्यासाठी त्याच्या जीवनात मातृ भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.


आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी मातृभाषेचे महत्व या विषयावरील मराठी निबंध (Matru Bhasheche Mahatva Nibandh Marathi) घेऊन आलेलो आहोत हा निबंध शाळा कॉलेज मधील सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे व याचा योग्य अभ्यास करून आपण परीक्षेत चांगल्या गुणांनी देखील उत्तीर्ण होऊ शकतात.



मातृभाषेचे महत्व निबंध | Matru Bhasheche Mahatva Nibandh Marathi

विशिष्ट ध्वनी, शब्द आणि वाक्यांचा समूह ज्याद्वारे आपल्या भावना इतरांपर्यंत पोहचवल्या जातात त्या माध्यमाला भाषा म्हटले जाते. याशिवाय मातृभाषा ही एक अशी भाषा असते जी आपण जन्मापासून बोलत असतो. आपल्यावरील सर्व संस्कार आणि आपले सर्व व्यवहार याच भाषेद्वारे पार पाडले जातात. मातृभाषा ही आपल्या संस्कृतीशी जुळलेली असते. 


भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळी भाषा बोलली जाते व प्रत्येक राज्याची मातृभाषा वेगवेगळी आहे. परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याची मातृभाषा मराठी ही आहे. मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत मातृभाषा व गोवा राज्याची सह अधिकृत भाषा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषिकांची एकूण लोकसंख्या 9 कोटी च्या आसपास आहे. मराठी भाषेचा इतिहास अतिशय प्राचीन आहे व म्हणूनच मराठी ही प्राचीन भाषांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मराठी साहित्यात वेगवेगळ्या काळात वेगवेगळे ग्रंथ साहित्य लिहिण्यात आले आहेत. ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ 745 वर्ष जुना आहे. मराठी भाषा ही 1000 वर्ष जुनी आहे.


आपल्या मातृभाषेत आपल्या संस्कृतीचा इतिहास समाविष्ट आहे. परंतु आजकाल अनेक पालकांचा कल विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देण्याकडे असतो. परिणामी मुलांना हिंदी आणि इंग्रजी भाषा तर बोलता येतात परंतु त्यांना मराठी भाषा वाचणे-लिहिणे तर सोडा व्यवस्थित बोलता देखील येत नाही. मातृ भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शाळा कॉलेज मध्ये मराठी चे शिक्षण अनिवार्य करायला हवे. मराठी मातृभाषेतून शिक्षण प्राप्त केल्यानंतर जॉब्स व पुढील करियर देखील मराठी भाषेतच उपलब्ध करायला हवे. आपल्या मराठी मातृभाषेत विद्यार्थी अधिक उत्तम तऱ्हेने आपले विचार व ज्ञान व्यक्त करू शकतील. ज्यामुळे त्यांना करियर साठी विविध संधि उपलब्ध होतील. 


मराठी भाषा आज ज्या रूपात जीवंत आहे त्या रूपात तिला जीवंत ठेवण्याचे प्रमुख कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले आहे. शिवरायांनी परकीय आक्रमणकारी शत्रूपासून आपल्या माय भूमीचे आणि मराठी माती चे रक्षण केले. मराठी भाषेत अनेक महान कवि, लेखक आणि विचारवंत होऊन गेलेत. यातील एक म्हणजे कवि कुसुमाग्रज, कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णु वामन शिरवाडकर असे होते. त्यांना मराठी साहित्याचे जनक म्हणूनही ओळखले जाते. कुसुमाग्रज यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.


आशा या मराठी मातृभाषेची महानता आणि मातृ भाषेचे महत्त्व आजच्या पिढीला समजावून सांगणे आवश्यक आहे. व सर्वांनी एकजुट होऊन मराठी चा प्रचार आणि संरक्षणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

***

मराठी भाषेचे महत्व निबंध <<वाचा येथे


तर मित्रहो आजच्या या लेखात आपण मातृभाषेचे महत्व मराठी निबंध - Matru Bhasheche Mahatva Nibandh Marathi पाहिला. आशा आहे आपणास हा निबंध आवडला असेल व ह्या निबंधातून आपणास आपली मराठी या महान मातृभाषेचे महत्व लक्षात आले असेल. आपणास हा निबंध कसा वाटला कमेन्ट करून नक्की सांगा.


अधिक वाचा 


EmoticonEmoticon