Friday 25 February 2022

व्हाटसप्प चा शोध कोणी लावला ? | Founder of whatsapp information in marathi

जगप्रसिद्ध मोबाइल messaging ॲप्लिकेशन व्हाटसप्प चा वापर जवळपास शंभर कोटीहून अधिक लोकांद्वारे केला जातो. दररोज व्हाटसप्प द्वारे करोडो मेसेज पाठवले जातात. आपणही जर एक अँन्ड्रॉईड अथवा आयफोन यूजर असाल तर आपण आपल्या मोबाइल मध्ये व्हाटसप्प चा वापर केलेला असेल. परंतु आपण कधी विचार केला आहे का की व्हाटसप्प चा शोध कोणी लावला व व्हाटसप्प चे जनक कोण आहेत? 

या लेखात आम्ही आपल्यासाठी व्हाटसप्प चा शोध कोणी लावला  व व्हाटसप्प विषयी ची काही उपयुक्त माहिती संग्रहित केलेली आहे. ही माहिती आपले जनरल नॉलेज वाढवण्यासोबतच आपणास काहीतरी नवीन शिकवण देऊन जाईल. 


whatsapp information in marathi

व्हाटसप्प चा शोध कोणी लावला ?

जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप्लिकेशन व्हॉट्सॲपचा आज वाढदिवस आहे. २४ फेब्रुवारी २००९ रोजी जेन कॉम याने व्हॉट्सॲप inc नावाची कंपनी स्थापन केली. जेन कॉम यांना व्हाटसप्प चे जनक मानले जाते. 

जेन कॉमचा जन्म युक्रेन देशातील छोट्या गावात झाला. त्याचे वडील मजूर, तर आई गृहिणी होती. युक्रेनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यावर त्याचे वडील अमेरिकेत स्थलांतरित झाले. तिथे ते छोटी-मोठी कामे करू लागले. जेन कॉमला कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची आवड होती. त्याच्या घराजवळच एक लायब्ररी होती. तेथून तो कॉम्प्युटर गेले प्रोग्रामिंगची पुस्तके आणत असे व घरच्या कॉम्प्युटरवर प्रोग्रामिंग करीत असे. पुढे त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवून एका सॉफ्टवेअर  कंपनीत सिक्युरिटी टेस्टर म्हणून काम सुरू केले.

१९९७ साली याहू कंपनीने इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर या पदावर त्याची नेमणूक केली. या कंपनीत त्याने २वर्षे नोकरी केली. स्वतःची कंपनी सुरू करावी या विचाराने त्याने याहूचा राजीनामा दिला. ब्रायन अकटन या त्याच्या सहकाऱ्यानेही राजीनामा दिला. दोघांनी मिळून स्वतःची कंपनी स्थापन करण्याचे ठरविले. त्या सुमारास ऍपल कंपनीने आयफोन बाजारात आणला होता.  त्यात मेसेज पाठविण्याची सुविधा  होती. त्यावरून या दोघांना एक कल्पना सुचली, २४ फेब्रुवारी २००९ रोजी त्यांनी व्हॉट्सॲप inc नावाची कंपनी स्थापन केली. 

सुरुवातीला खूपच कमी प्रतिसाद मिळाला; पण जसजशी स्मार्ट फोन्सची संख्या वाढत गेली, तसे व्हॉट्सॲप लोकप्रिय होत गेले. आज जगातील किमान शंभर कोटीहून अधिक लोक व्हॉट्सॲपचा वापर करतात. व्हॉट्सॲपवर रोज ४३००० कोटी मेसेज पाठविले जातात, १६० कोटी फोटो, तसेच २५ कोटी व्हिडिओ शेअर होतात. सुरुवातीला फक्त इंग्रजीमध्ये असणारे व्हॉट्सॲप आज ५३ भाषांमध्ये उपलब्ध आहे. 

आतातर व्हॉट्सॲपवरून पैसेही पाठविता येऊ शकतात. त्यातील अनेक नवनव्या फिचर्समुळे व्हॉट्सॲप झपाट्यानं लोकप्रिय झालं. २०१४ साली फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गने १९ बिलियन डॉलरला जेन कॉम आणि ब्रायन अकटन यांच्याकडून व्हॉट्सॲप खरेदी केले. आज या ॲपची मालकी मार्क झुकेरबर्गच्या मेटा या कंपनीकडे आहे. व्हॉट्सॲपला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

-श्याम ठाणेदार दौंड पुणे


या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत व्हाटसप्प चे जनक कोण (Founder of whatsapp in marathi) व त्यांचा जीवन परिचय (whatsapp information in marathi) या विषयी थोडक्यात माहिती शेअर केली. ही माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांना याविषयी ची माहिती मिळेल. 


EmoticonEmoticon