सावित्रीबाई फुले भाषण मराठी - savitribai phule speech in marathi : मित्रानो भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची आज 191 वी जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिला अधिकार व महिला शिशु हत्या रोकण्यासाठी अभियान चालवले होते. त्यांनी नवजात कन्या शिशुंसाठी आश्रम पण उघडले.
एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतः शिक्षित होऊन समाजाच्या कुरीतीना संपवले आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे पण उघडून दिलीत. सावित्रीबाई या समजाची पर्वा न करता आपले कार्य करीत राहिल्या त्यांच्या या कार्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी सुद्धा खूप मदत केली.
आज आम्ही तुमच्यासाठी सावित्रीबाई फुले माहिती, Savitribai phule bhashan व सावित्रीबाई फुले यांचे भाषण देणार आहे. तर चला सुरू करूया..
सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी - Savitribai phule bhashan in marathi
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी, 1831 साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगांव येथील दलित कुटुंबात झाला. त्यांचा वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. 1840 साली नऊ वर्षाच्या वयात त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी लावण्यात आले. ज्योतीराव फुले हे एक सामाजिक कार्यकर्ता होते. ज्या वेळी सावित्रीबाईंचे लग्न झाले तेव्हा त्यांचे काहीही शिक्षण झाले न होते. सावित्रीबाईंच्या समाज कार्यात जोतिबाची त्यांना भरपूर साथ मिळाली. त्यांनी सावित्रीबाईंना घरातच शिकवणे सुरू केले. जोतिबांच्या या कार्याला सावित्रीबाईंच्या वडिलांचा विरोध होता, पण तरीही जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकवणे सुरू ठेवले. या नंतर त्यांनी सावित्रीबाईंचे एडमिशन एका विद्यालयात केले. समाजातील लोक याला विरोध करू लागले. पण त्या कडे लक्ष न देता सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या स्त्री शिक्षणासाठी कार्य करायला लागल्या. ज्योतिबा फुलेंच्या सहकार्याने त्यांनी वर्ष 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिले विद्यालय सुरू केले. या शाळेत त्या काळात केवळ 9 मुलींनी प्रवेश घेतला. सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्या काळात दलित व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार न होता. ज्या वेळी सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असता तेव्हा रस्त्यांना जात असताना लोक त्यांच्यावर शेण व कचरा फेकत असतं. तरीही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. ज्योतिबा फुले यांना समाजातील इतर लोकांद्वारे धमक्या मिळू लागल्या, या धमक्यांना घाबरून जोतिबांच्या वडिलांनी त्यांना घरातून काढून दिले.
सावित्रीबाई फुले या देशाच्या प्रथम महिला महिला मुख्यद्यापिका आणि नारी मुक्त आंदोलनाच्या नेता होत्या. एकणाविसव्या शतकात त्यांनी अस्पृश्यता, सतीप्रथा, बाल विवाह, विधवा विवाह ई. क्रुरिती विरुद्ध सुद्धा कार्य केले. सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्या करायला जात असलेल्या एक गर्भवती विधवा ब्राह्मण महिला, काशीबाई ह्यांना वाचवून आपल्या घरी डिलिवरी केले. त्यांचा मुलगा यशवंत याला आपला दत्तक पुत्र म्हणून मोठे केले. 10 मार्च 1897 साली ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला. जोतिबांच्या राहिलेल्या कार्याला पूर्ण करणे सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य समजले. आपले पूर्ण आयुष्य त्यांनी दलित व वाचीतांच्या अधिकारांसाठी घालून दिले. 1897 साली देशात प्लेग ची साथ पसरली होती. सावित्रीबाई या प्लेग च्या रुग्णांची पूर्ण श्रध्देने सेवा करीत होत्या. प्लेग संक्रमित लोकांची सेवा करीत असतानाच त्यांनाही प्लेग झाला व 10 मार्च 1897 ला प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले. आज जगात वाढत असलेल्या स्त्री सशक्तीकरणाची सुरुवात सावित्रीबाई व जोतिबांच्या प्रयत्नामुळेच संभव होती. अश्या या महान समाज सुधारकांना माझा प्रणाम.
--समाप्त--
मित्रानो हे होते सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी मध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले भाषण मराठी - savitribai phule speech in marathi कसे वाटले आम्हाला कंमेंट च्या माध्यमाने कळवा. आणि लक्षात असू द्या मराठी भाषणे व निबंधांसाठी भेट द्या www.bhashanmarathi.com.
EmoticonEmoticon