Wednesday, 22 November 2023

इंदिरा गांधी निबंध मराठी | Indira Gandhi Essay in Marathi

देशाच्या इतिहासातील प्रसिद्ध पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी चा इंदिरा गांधी निबंध मराठी व Indira Gandhi Essay in Marathi. या Indira Gandhi nibandh in marathi ला नक्की वाचा व शेअर करा.

देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या त्यांच्याद्वारे त्या काळात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांमुळे चर्चेचा व अनेकदा वादाचा विषय होत्या. इंदिरा गांधी देशाच्या प्रसिद्ध पंतप्रधानांमधून एक होत्या. इंदिरा गांधी विषयीची माहिती देणारा पुढील निबंध आपल्यासाठी फार उपयोगाचा ठरणार आहे. 

पुढील लेखात आपणास इंदिरा गांधी निबंध मराठी भाषेतून देण्यात येत आहे. हा निबंध शाळा कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी फारच उपयोगाचा आहे. तर चला निबंधला सुरुवात करूया..

 


इंदिरा गांधी निबंध मराठी - Indira Gandhi Essay in Marathi

भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, एक अशा विलक्षण व्यक्तिमत्त्व होत्या ज्यांनी देशाच्या राजनीती वर तर आपली छाप सोडलीच, परंतु विश्व राजनीतीच्या क्षितिजावर देखील आपला विलक्षण प्रभाव निर्माण केला. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना "लौह महिला" या नावाने संबोधित करण्यात आले. 


श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म नेहरू कुटुंबात झाला होता. त्या भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एकुलत्या एक कन्या होत्या. आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या या नावानेच फक्त इंदिरा गांधी यांना ओळखले जात नाही तर त्यांची प्रतिभा आणि राजकीय दृढतेमुळे त्यांना "विश्व राजनीतीच्या" इतिहासात कायम आठवण केले जात आहे. इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 साली उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद येथे एका संपन्न कुटुंबात झाला. त्यांचे जन्माचे पूर्ण नाव "इंदिरा प्रियदर्शनी" असे होते. याशिवाय त्यांना घरातील मंडळींद्वारे एक टोपण नाव देखील मिळाले होते, जे इंदिराचे संक्षिप्त रूप "इंदू" होते. त्यांच्या वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू आणि आजोबांचे नाव मोतीलाल नेहरू होते. वडील आणि आजोबा दोन्हीही वकिलीच्या व्यवसायात होते. देशाच्या स्वातंत्र्यात दोघांचे अतिशय महत्त्वाचे योगदान होते. याशिवाय इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव "कमला नेहरू" असे होते.


इंदिरा गांधी यांचा जन्म अशा कुटुंबात झाला जे आर्थिक व बौद्धिक दोन्ही दृष्ट्या संपन्न होते. त्यांचे इंदिरा हे नाव त्यांचे आजोबा पंडित मोतीलाल नेहरू यांनी ठेवले होते. इंदिरा नावाचा अर्थ तेज, लक्ष्मी आणि शोभा असा होतो. देवी लक्ष्मी आणि दुर्गा मातेच्या स्वरूपात आपल्याला नात प्राप्त झालेली आहे, या उद्देशाने त्यांच्या आजोबांनी इंदिरा हे नाव ठेवले. इंदिरा गांधी या पंडित नेहरूंना खूप प्रिय वाटायच्या आणि म्हणूनच ते त्यांना 'प्रियदर्शनी' या नावाने संबोधित करीत असत. इंदिरा गांधी यांचे वडील पंडित नेहरू व आई कमला नेहरू दोन्हीही आकर्षक व्यक्तिमत्व आणि सौंदर्याने परिपूर्ण होते, इंदिरा यांना ही सुंदरता त्यांच्या आई-वडिलांकडूनच मिळाली होती. इंदिरा यांना त्यांचे "गांधी" आडनाव फिरोज गांधी यांच्याशी विवाह केल्यानंतर मिळाले.


इंदिरा गांधींना त्यांच्या बालपणात एक स्थिर कौटुंबिक जीवनाच्या अनुभव मिळाला नाही. यामागील कारण असे होते की 18 वर्षाच्या वयातच 1936 साली त्यांच्या आई कमला नेहरू यांचे क्षयरोगामुळे निधन झाले. एकीकडे आईचे छत्र हरवले तर दुसरीकडे वडील हे स्वातंत्रता आंदोलनात कायम व्यस्त असायचे. 


पंडित जवाहरलाल नेहरू शिक्षणाचे महत्त्व जाणून होते. म्हणूनच त्यांनी इंदिरा यांना प्राथमिक शिक्षण घराच्या पोषक वातावरणात मिळावे यासाठी घरीच प्राथमिक शिक्षणाची सोय केली. नंतरच्या काळात एका प्रतिष्ठित शाळेत त्यांचा प्रवेश करण्यात आला. १९३४-३५ मध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंदिरा गांधी यांनी शांतिनिकेतन मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या द्वारे बनवण्यात आलेल्या "विश्वभारती विश्वविद्यालयात" प्रवेश घेतला.


यानंतर १९३७ मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. इंदिरा गांधी यांना लहानपणापासूनच वर्तमानपत्र व पुस्तके वाचण्याची आवड होती. त्यांची ही आवड शालेय व महाविद्यालयीन जीवनातही कायम राहिली. वाचनाचा एक फायदा त्यांना हा मिळाला की त्यांचे सामान्य ज्ञान फक्त पुस्तकांपुरते मर्यादित न राहता त्यांना देश व जगाचे बरेचसे ज्ञान प्राप्त झाले आणि त्या अभिव्यक्तीच्या कलेत देखील पारंगत झाल्या. विद्यालयात होणाऱ्या वादविवाद स्पर्धेत त्यांच्यासमोर तर कोणीच टिकाव धरू शकत नव्हते.


असे असूनही, त्या कायम एक सामान्य दर्जाच्या विद्यार्थिनी होत्या. इंग्रजी व्यतिरिक्त इतर विषयांमध्ये त्यांची विशेष कार्यक्षमता दिसली नाही. परंतु इंग्रजी भाषेवर त्यांची फार चांगली पकड होती. यामागील कारण होते, त्यांचे वडील पंडित नेहरू यांच्याद्वारे त्यांना इंग्रजीत लिहिले गेलेले लांब लांब पत्र. पंडित नेहरू इंग्रजीचे इतके सक्षम जाणकार होते की त्यांच्यासमोर लॉर्ड माऊंटबॅटन यांची इंग्रजी देखील टिकाव धरत नसे.


१९४२ साली इंदिरा गांधी यांचे प्रेम विवाह फिरोज गांधी यांच्याशी झाले. पारशी युवक फिरोज गांधी यांच्याशी इंदिरा गांधींची ओळख ऑक्सफर्ड विश्वविद्यालयात शिक्षणादरम्यान झाली होती. त्याकाळी फिरोज गांधी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अध्ययन करीत होते. नंतरच्या काळात दोघांमधील मित्रता वाढत गेली आणि शेवटी त्यांनी एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधींनी त्यांचा हा विचार पंडित नेहरू समोर मांडला. परंतु पंडित नेहरू त्यांच्या या विवाहासाठी तयार नव्हते, नेहरूंचे मत होते की विवाह हे कायम सजातीय कुटुंबात व्हायला हवेत. 


स्वतः त्यांनी देखील विवाहाच्या वेळी आपले वडील पंडित मोतीलाल नेहरू यांचे आदेश मानले होते. आणि म्हणूनच त्यांनी अनेक पद्धतीने इंदिरा यांना समजवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु इंदिरा यांचा हट्ट कायम राहिला. शेवटी कुठलाही मार्ग उपलब्ध नसलेला पाहून नेहरूंनी विवाहास सहमती दर्शवली. लग्नानंतर १९४४ मध्ये इंदिरा व फिरोज गांधी यांना राजीव गांधी आणि त्याच्या दोन वर्षानंतर संजय गांधी पुत्र म्हणून प्राप्त झाले. सुरुवाती काळात त्यांचे वैवाहिक जीवन ठीकठाक होते परंतु नंतरच्या काळात त्यात कलह निर्माण होऊ लागला. अनेक वर्षांपर्यंत त्यांचे नाते डगमग करीत राहिले. याच दरम्यान ८ सप्टेंबर १९६० मध्ये इंदिरा गांधी जेव्हा आपल्या वडिलांसोबत एका विदेश दौऱ्यावर होत्या तेव्हा फिरोज गांधी यांचा मृत्यू झाला.

-- समाप्त --

वाचा> इंदिरा गांधी यांची संपूर्ण माहिती

तर मंडळी या लेखात आपल्यासोबत इंदिरा गांधी निबंध मराठी भाषेतुन शेअर करण्यात आलेला आहे. आम्हाला आशा आहे की आपणास हा Indira Gandhi Essay in Marathi आवडला असेल व आपल्या शालेय अभ्यासात उपयोगाचा देखील ठरला असेल. जर आपले काही प्रश्न असतील तर आपण आमच्या ब्लॉग वर खाली कमेन्ट करून  विचारू शकतात. धन्यवाद..


अधिक वाचा


EmoticonEmoticon