शिक्षक दिनाचे मराठी भाषण - Teachers Day Speech in Marathi : नमस्कार मित्रांनो आपल्या देशात दरवर्षी 5 सप्टेंबेर ला शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या सन्मानार्थ शिक्षक दिनाचे भाषण देतात.
विद्यार्थ्यांच्या आवश्यकता पूर्ती साठी आम्ही पुढे काही Teachers day marathi speeches देत आहोत. ही शिक्षक दिनाची मराठी भाषणे मराठी भाषेतील तज्ज्ञांद्वारे अतिशय सरल भाषेत लिहिण्यात आली आहेत. या भाषणांचा उपयोग विद्यार्थी हे शिक्षक दिनी "शिक्षक दिनाचे भाषण" म्हणून करू शकतात. पुढे देण्यात आलेल्या भाषणांमधून कोणतेही एक भाषण आपण निवडू शकतात.
शिक्षक दिनाचे भाषण मराठी - Teachers Day Speech in Marathi
भाषण 1 (300 शब्द)
आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रथम आपणास शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव निखिल राजपूत आहे आजच्या या शुभ प्रसंगी शिक्षक दिनानिमित्त मी शिक्षकांचे महत्त्व या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे. आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे हीच विनंती...
मित्रांनो आपण सर्वानांच माहीत आहे की दर वर्षी पाच सप्टेंबरला संपूर्ण भारतात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती... डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण ज्यांच्यामुळे आपले पुढील जीवन सुखाचे होणार आहे, ज्यांच्यामुळे अनेक आदर्श नागरिक घडले आणि इथून पुढे असंख्य आदर्श नागरिक घडणार आहेत आशा शिक्षकांचा सन्मान करण्याचा त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा शुभ दिवस आहे.
शिक्षक हा जरी लहानसा तीन अक्षरी शब्द असला तरी या शब्दात व व्यक्तिमत्वात अत्यंत प्रचंड शक्ती आहे. एका उत्तम शिक्षकांमुळे विद्यार्थ्याचे जीवन बदलून जाते. विद्यार्थ्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांना ज्ञानाचा प्रकाशात आणण्याचे महान कार्य शिक्षक करतात. आपल्या जीवनात जेवढे आई व वडिलांना महत्त्व आहे तेवढेच महत्त्व शिक्षकांना देखील आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटक आहेत, त्यांच्यामुळेच देशाचे व समाजाचे आदर्श नागरिक घडतात. विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य आकार देणे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न करणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुखाचे व्हावे यासाठी नेहमी त्यांना मार्गदर्शन करणे अशी अनेक महत्वाची कामे शिक्षक करतात. केवळ पुस्तकी ज्ञान न शिकवता माणसाने माणूस म्हणून कसे जगावे याचे ज्ञान देखील ते देतात.
आजच्या शुभ प्रसंगी मी आपणास एवढेच सांगू इच्छितो की आपण सर्वांना अतिशय प्रभावशाली शिक्षकवर्ग लाभलेले आहेत. आयपण नेहमीच त्यांचा आदर करायला हवा. शिक्षकांसाठी वर्गातील सर्व विद्यार्थी सारखेच असतात. ते जेवढी आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतात तेवढीच आपण त्यांची काळजी घ्यायला हवी. शाळेत एखादा विद्यार्थी चुकत असेल तर त्याला शिक्षा केली जाते परंतु शिक्षा करण्यामागे शिक्षकांचे एकमेव हेतू हाच असतो की ती चूक त्या विद्यार्थ्यांना पुन्हा कधीही करू नये. शिक्षकांमुळे आपले आयुष्य घडते त्यांच्या प्रयत्नामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच व्यक्ति यशाच्या शिखरावर पोहचतो. आशा सर्व शिक्षकांना नमन..!
***
शिक्षक दिन मराठी भाषण - Shikshak din bhashan marathi
भाषण 2
आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. जसे की आपण सर्वांना माहित आज आपण येथे शिक्षक दिवस साजरा करण्यासाठी व देशाचे भविष्य निर्माण करणाऱ्या शिक्षकांच्या कठिण कार्याला सन्मानित करण्यासाठी जमलेलो आहोत. आजचा हा 5 सप्टेंबर चा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने 'शिक्षक दिवस' म्हणून साजरा केला जातो. आजच्या हे भाषण सुरू करण्या अगोदर मी, मला येथे भाषण देण्याची संधी दिल्याबद्दल आमच्या वर्ग शिक्षकांचे आभार व्यक्त करू इच्छितो.
मित्रांनो दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. खरे पाहता 5 सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या देशाचे एक महान शिक्षक, दार्शनिक व विद्वान विचारवंत होते. नंतरच्या काळात ते देशाचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती देखील बनले. डॉक्टर राधाकृष्णन स्वामी विवेकानंद आणि वीर सावरकर यांना आपले आदर्श मानत असत. त्यांनी विवेकानंद आणि सावरकर यांच्या जीवनावर सखोल अभ्यास केला होता. आपले भाषण व लेखनाच्या माध्यमाने राधाकृष्णन यांनी संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीशी परिचित केले. राधाकृष्ण बहुआयामी व्यक्तिमत्त्व असण्यासोबतच भारतीय संस्कृतीशी प्रेम करणारे देखील होते. म्हणूनच आजचा हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
संपूर्ण देशातील विद्यार्थी आजचा हा दिवस शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी साजरा करतात. शिक्षकांना समाजाचा 'पाठीचा कणा' म्हटले जाते. विद्यार्थ्यांचे चारित्र्य निर्माण करून त्याला देशाचा एक आदर्श नागरिक बनवण्याचे महत्वपूर्ण कार्य शिक्षक करतात. शिक्षकांचा व्यवसाय इतर सर्व व्यवसाय पेक्षा जास्त जबाबदारीचा असतो. कारण एका शिक्षकावरच देशाचे भविष्य अवलंबून असते.
शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे वागतात. म्हणूनच शिक्षकांना आई-वडिलां पेक्षाही उच्च स्थान दिले जाते. आई वडील मुलाला जन्म देतात तर शिक्षक त्याला एक चांगला नागरिक घडवतात. म्हणून आपण कधीही शिक्षकांच्या या कार्याला दुर्लक्षित करता कामा नये, आपण नेहमी शिक्षकांना प्रेम व सन्मान द्यायला हवा.
आपले आई-वडील आपल्याला प्रेम व योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात. परंतु शिक्षकाची जबाबदारी आपले भविष्य उज्ज्वल व यशस्वी करण्याची असते. ते नेहमी कार्यरत राहून आपले आयुष्य शिक्षित करीत असतात. ते आपल्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत असतात. शिक्षक आपल्याला महान लोकांची उदाहरणे देऊन व गोष्टी सांगुन नेहमी प्रेरित करीत असतात. माझ्या प्रिय मित्रांनो आज तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आपण नेहमी शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करून त्यांना सन्मान दिला पाहिजे. धन्यवाद.
***
Teachers Day Speech in Marathi या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत शिक्षक दिन भाषण -Teachers Day Speech in Marathi शेअर केले आहेत. आशा आहे आपणास ही भाषणे उपयोगी ठरतील. 5 सप्टेंबर शिक्षकदिनी आपण आपल्या शाळेत या भाषणाचा उपयो कराव. याशिवाय हा लेख आपले शाळकरी मित्र मैत्रिणी सोबातही नक्की शेअर करावा.
Read more:
EmoticonEmoticon