Saturday 5 August 2023

रक्षाबंधन सणाची माहिती मराठी | Rakshabandhan Information in Marathi

रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा सण बहिण भावाच्या प्रेमाचं, रक्षणाचं प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून तिच्या रक्षणाची जबाबदारी भावावर टाकत असते. या राखीच्या छोट्याशा धाग्यात सुद्धा खूप मोठी ताकद असते. 

साधारणपणे वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन हा सण येतो. हिंदू पंचांगानुसार पहिले तर श्रावण महिन्यात जी पौर्णिमा येते ती पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा सण होय.

रक्षाबंधन हा सण कसा सुरू झाला? रक्षाबंधन माहिती मराठी, या सणाचा इतिहास जाणून घेऊन राखी चे महत्व आपण या लेखातून समजून घेऊयात, रक्षाबंधनची ही खास Rakshabandhan Information in Marathi फक्त आपल्यासाठी...



रक्षाबंधन मराठी माहिती - Rakshabandhan Information in Marathi

रक्षाबंधन सणाची संपूर्ण माहिती, इतिहास आणि या सणाचे काय महत्व आहे. याविषयी सर्व माहिती या पुढे देत आहोत.

रक्षाबंधन सणाचे महत्व

भारत हा अनेक जाती-धर्माचा, सण आणि वृत्तवैकल्याचा देश आहे, बाकी सणांसारखा रक्षाबंधन हा सुद्धा मोठ्या उत्साहात होणारा सण आहे. बहिण भावाच्या प्रेमाचं, आपुलकीचं त्यांच्या नात्यांना उजवी देण्याचं एक माध्यम म्हणजे रक्षाबंधन आहे. भारतात हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो जसं भारताच्या उत्तर भागात हा " कजरी पौर्णिमा" म्हणून तर भारताच्या दक्षिण प्रांतात " नारळी पौर्णिमा" या नावाने साजरा होतो. 

रक्षाबंधन चा अर्थ बघितला तर बहिणीने भावाकडे तिच्या संरक्षणाची केलेली मागणी असते, आणि भावाकडून रक्षाबंधन म्हणजे बहिणीला रक्षा करण्याचे दिलेलं वचन असतं म्हणून या दिवशी बहीण भावाला राखी बांधून त्याच्या कर्तबगार हातात तिच्या रक्षणाची जबाबदारी देत असते. 

आजच्या युगात आपण बऱ्याचदा सोशल मीडियावर बघतो की ज्या घरात भाऊ नाही किंवा ज्या बहिणीला भाऊ नाही ती बहीण आपल्या मोठ्या कर्तृत्ववान बहिणीला राखी बांधताना दिसते म्हणजेच राखी आपण कुणाला बांधतो तर जी व्यक्ती आपली संरक्षणाची जबाबदारी उचलते तिची कृतज्ञता म्हणून आपण त्या व्यक्तीला राखी बांधत असतो असा त्याचा अर्थ होतो.

रक्षाबंधन या सणातून भावा बहिणीच्या नात्याला एक वेगळ्या प्रकारे उजाळी मिळते त्यांच्यात आपुलकीची वाढ होते आपल्या रक्षणाची जे जबाबदारी उचलतात त्यांच्याविषयी बहिणीच्या मनात एक आधाराची आणि प्रेमाची भावना उत्पन्न होते म्हणून रक्षाबंधन हा सण बहिण भावाला जोडण्याचा सण मानला जातो.


रक्षाबंधन सणाचे परंपरागत महत्व

मध्यम युगात परकीय आक्रमण होत असत त्यावेळी आपल्या परिसरातील स्त्रियांचे संरक्षण करण्याची जवाबदारी तिथल्या धाडसी, शूरवीर पुरुषांवर असते, आणि राखी बांधून तिथल्या स्त्रिया त्या पुरुषांकडे आपल्या संरक्षणाचे साकडे घालत असत म्हणून त्या काळात रक्षाबंधन या सणाला विशेष महत्त्व प्राप्त झालं तसेच महाराष्ट्रात हा सण कोळी बांधवांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. रक्षाबंधन या सणाच्या वेळी वरुण देवाची आराधना केली जाते वरुण देवाला पूजण्यात येत, श्रावण महिन्यात पौर्णिमेला जर श्रावण नक्षत्र आलं तर तो क्षण अत्यंत लाभदायक म्हणून समजल्या जातो, तो क्षण शुभकार्यासाठी मुहूर्त म्हणून मानल्या जातो. श्रावण महिन्यात शेतकऱ्याची पेरणी होऊन धान्य उगवतीचे दिवस असतात आपल्या धान्याची भरभराट होण्यासाठी वेद पुराणाची कथा शेतकऱ्याकडून ऐकली जाते हा तो पौर्णिमेचा सण, कोळी बांधवांमध्ये नवीन शिक्षणाला प्रारंभ या दिवशी केलं जातं आणि ते शौर्याचे प्रतिक समजलं जातं म्हणून हा सण त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो.


रक्षाबंधन सणाचा इतिहास

रक्षाबंधन विषयी आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक कथा व प्रसंग सांगण्यात आलेले आहेत. काही निवडक व प्रसिद्ध प्रसंग पुढील प्रमाणे आहेत.

देव दानव युद्ध

रक्षाबंधन कधी सुरू झाले? कशा पद्धतीने सुरू झाले याची निश्चित माहिती नाही परंतु त्याविषयी काही आख्यायिका आहेत. प्राचीन काळी देव आणि दानवांचे युद्ध सुरू झाले होते त्यात दानवांची शक्ती वरचढ झाली होती देव पराजयकडे आले होते, व्रत्रासुर या दानव राजाने देवांचा राजा इंद्रदेव याला युद्धाचे आव्हान केले, युद्धाला जाताना इंद्राच्या पत्नीने त्याच्या हातात एक धागा बांधला जो तिला विष्णू कडून मिळाला होता त्या दोऱ्याला राखी म्हणत.. त्या धाग्याने प्रभावित होऊन इंद्र मोठ्या आत्मविश्वासाने लढला आणि विजयी झाला‌. तेव्हा पासून मनगटावर राखी बांधण्याची प्रथा सुरू झाली असं पौराणिक कथा सांगतात


राजा बळी

तसेच श्रीमद्भागवतात एक कथा आलेली आहे, बळी नावाचा राजा होता त्याने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्याच्या दानाची परीक्षा पाहण्यासाठी भगवान विष्णू ने वामन अवतार धारण केला. बळी हा दानवीर होता दान मागितलेल्या गोष्टीला तो कधीच नकार देत नसत म्हणून वामन अवतारीत विष्णू ने बळीकडे त्रिपद्मभूमी मागितली म्हणजेच तीन पावलं जमीन, बळी राजाने भगवान विष्णूला होकार दिला आणि वामन रुपी विष्णूला तीन पावलं जमिनीवर ठेवण्याचे विनंती केली, विष्णूंनी पावलं ठेवायला सुरुवात केली पहिल्या पावलात विष्णूच्या जमीन व्यापली दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला आणि तिसऱ्या पावलाला जागा उरली नाही तेव्हा वामन रुपी विष्णू ने बळीला विचारले तिसरं पाऊल कुठे ठेवू? तेव्हा बळीराजाने सांगितलं तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा तेव्हा वामनाने तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात घातलं तेव्हा बळीने ठरवलं आता आपण पाताळात राहायचं. 

परंतु तेव्हा त्याने वामन रुपी विष्णू कडून एक वरदान मागितलं " मला एक वरदान द्या वामन रुपी भगवान विष्णू पाताळातून कोणत्याही क्षणी मी तुमच्याकडे बघू शकेन झोपेत सुद्धा आणि जागेपने सुद्धा मला तुमचे दर्शन होईल असं वरदान द्या " तेव्हा विष्णू ने तथास्तु म्हणून बळीराजाला वरदान दिलं तेव्हापासून प्रसन्न होऊन विष्णू बळीच्या दारावर राहू लागले त्यामुळे लक्ष्मी मातेला आपल्या पतीचे दर्शन दुर्लभ झाले. काही दिवसांनी लक्ष्मी माता विष्णू कडे गेल्या आणि विष्णूला परत वैकुंठी चला म्हणून विनंती करू लागल्या तेव्हा विष्णूंनी नकार देत सांगितलं की मी आता बळीचा सेवक झालेलो आहे त्याच्या इच्छे शिवाय मी आता इथून कुठेही जाऊ शकत नाही तेव्हा लक्ष्मी माता नाराज होऊन परत आल्या आणि लागलीच नारदांकडे गेल्या, नारदांकडे गेल्या गेल्या लक्ष्मी माता नारद मुनींकडे एक उपाय मागू लागल्या माझ्या पतीला म्हणजेच विष्णू देवाला मी वैकुंठात परत कसा आणावं तेव्हा नारदाने एक उपाय सांगितला तुम्ही राजा बळी कडे जाऊन त्याला भाऊ मानून आपल्या पतीची सुटका करून घ्या.  

यानंतर तातडीने लक्ष्मी माता पाताळात आल्या आणि बळीराजाच्या दरबारात रडू लागल्या, बळीराजा हे बघताच धावून आला आणि लक्ष्मी मातेला ओळखतास त्याने लक्ष्मी मातेला साष्टांग नमस्कार घातला आणि तो बोलू लागला " लक्ष्मी माता आपण का रडत आहात या दानवीर बळीच्या राज्यात कोणी रडत नाही आणि तुम्ही साक्षात विष्णू पत्नी असताना आणि माता लक्ष्मी असताना का रडत आहात तेव्हा मातेने सांगितलं की या लक्ष्मी मातेला कोणी भाऊ नाही म्हणून ती रडत आहे त्यावर उपाय म्हणून बळीराजांनी एक विनंती केली की तुम्हाला हरकत नसेल तर हा बळीराजा तुमचा भाऊ बनायला तयार आहे त्यावर लक्ष्मी मातेने लगेच होकार दिला आणि आपल्या रेशमी साडीच्या पदराचा एक धागा काढून त्यांनी बळीराजाच्या उजव्या मनगटावर बांधला तेव्हा बळीराजांनी लक्ष्मी मातेकडे बघून म्हटलं या बहिणीची काही इच्छा मी पूर्ण करू शकतो का तेव्हा लक्ष्मी मातेने सांगितलं की या बहिणीची एकच इच्छा आहे तिचा नवरा तिला तिच्यासोबत परत वैकुंठात हवा आहे तेव्हा बळीराजांनी लक्ष्मी मातेला एक वचन दिल की तुम्ही भगवान विष्णूंना वैकुंठात परत घेऊन जाऊ शकता लक्ष्मी मातेला दिलेल्या वचन बळीराजांनी पूर्ण केलं तेव्हापासून वचनपूर्तीचा हा सण आजपर्यंत ही साजरा केला जातो. 


श्रीकृष्ण आणि द्रोपदी

त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना महाभारतातील एक कथा माहीत असेल, भगवान कृष्णाच्या बोटाला ज्यावेळी जखम झाली होती त्यावेळी द्रोपती ने आपल्या साडीचा काठ फाडून कृष्णाच्या बोटाला ते वस्त्र बांधले होते तेव्हा कृष्णाने तिला एक वचन दिलं होतं " आज तू माझ्या जखमेवर तुझं वस्त्र बांधला आहे त्याच वस्त्राच्या साक्षीने तुला एक वचन देतो तुझ्या गरजेच्या वेळी मी तुझं रक्षण करेल" आणि या वाचनाची पूर्तता भगवान श्रीकृष्णाने द्रोपदीच्या वस्त्रहरण च्या वेळी करून दाखवली तेव्हापासून त्या रेशमी धाग्याला त्या रेशमी वासराला किंमत प्राप्त झाली आणि वचनाचे महत्त्व वाढलं आणि भावाकडून मिळालेलं वचन बहिणीसाठी संरक्षणाचे ठरलं.


रक्षाबंधनाचे शास्त्र आणि विज्ञान

राखी मनगटावर बांधण्याचे एक महत्त्व आहे, त्यामध्ये एक शास्त्र आहे. रक्षाबंधन ज्या पौर्णिमेला येतं त्या पौर्णिमेच्या प्रारंभापासून ते समाप्तीपर्यंत सृष्टीमध्ये यमलहरींचे प्रमाण जास्त असते. आणि या यमलहरी पुरुषाच्या शरीरात प्रवेश करून अधिक गतिमान होतात असा एक समज आहे त्याचबरोबर पुरुषाच्या शरीरात असणारी सूर्य नाडी जागृत झाली तर त्यापासून त्या पुरुषाला धोका असतो त्यामुळे पुरुषाच्या उजव्या मनगटावर राखी बांधून त्या सूर्यनाडीला शांत ठेवलं जातं किंवा तिला जागृत होण्यापासून रोखले जातं त्यातून ती जागृत न होऊन आपल्या भावाचं संरक्षण होतं आणि ते एका बहिणीकडून केलं जातं म्हणून रक्षाबंधनामध्ये हे शास्त्र सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून राखीचं इतकं जास्त महत्त्व आहे. अशा पद्धतीने रक्षाबंधन सणाचे महत्व, पावित्र्य आणि शास्त्र आहे, जे आपण हा सण साजरा करून जपलं पाहिजे.

-पायल


तर मंडळी या लेखाद्वारे आपण रक्षाबंधन सणाची माहिती तर प्राप्त केलीच परंतु त्यासोबत रक्षाबंधन चा संपूर्ण इतिहास देखील जाणून घेतला. या लेखात देण्यात आलेली Rakshabandhan Information in Marathi आपले ज्ञान वाढवण्यास नक्कीच उपयोगाची ठरेल अशी आशा आम्ही व्यक्त करतो. आपणास हा लेख कसा वाटला कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद


EmoticonEmoticon