Sunday, 25 June 2023

अपसटकस अप मरठ | Upstox Information in Marathi

मित्रांनो अनेक लोक ट्रेडिंग करून पैसे कमावण्याचे स्वप्न बघत असता, पण नक्की काय करावे, कसे करायचे आणि कुठला प्लॅटफॉर्म वापरावा याबद्दल त्यांना माहीत नसते.


तर मंडळी आज आपण अपस्टॉक(Upstox Information in Marathi) ह्या कंपनी बद्दल जाणून घेणार आहोत. अत्यंत कमी दरात ट्रेडिंग ची संधि आणि मोफत ट्रेडिंग अकाऊंट ओपेन करून देणारी ही भारतातील पहिली ट्रेडिंग कंपनी आहे.


ह्या कंपनीमध्ये तुम्ही इक्विटी(Equity), कमोडिटी (Commodity), करन्सी(Currency), फ्युचर्स(Futures) अशा सगळ्या विभागांवर ट्रेडिंग करू शकतात.


अपस्टॉक्समध्ये कलारी कॅपिटल, रतन टाटा, जीव्हीके डायबिक्स अशा नामांकित गुंतवणूकदारांचा सहभाग आहे. त्यामुळे ही कंपनी विश्वासार्ह मानली गेली आहे आणि भरपूर लोकं ह्या कंपनीद्वारे ट्रेडिंग करतात.



अपस्टॉक्स अँप माहिती - Upstox Information in Marathi

अप स्टॉक स्ट्रेडींग प्लॅटफॉर्मवर तुम्ही Trading, Bar Analysis, Charting अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी करू शकतात.


हा प्लॅटफॉर्म वापरायला अगदी सोपा आहे. या प्लॅटफॉर्ममुळे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने stock खरेदी आणि विक्री करू शकतात. त्यामुळे कुणीही हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वापरू शकतो. तुम्ही वेबसाईट किंवा  मोबाईल एपचा उपयोग करून ट्रेडिंग करू शकतात.


अपस्टॉक्स प्रोद्वारे तुम्ही इक्विटी इंट्राडे, कमोडिटीज आणि करन्सी या सर्वांमध्ये ट्रेडिंग करू शकतात. अपस्टॉक्स प्रो वापरण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागते. हा प्लॅटफॉर्म ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टीम आणि रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम यावर आधारित आहे.


वाचा> शेअर मार्केट ची मराठी माहिती


अपस्टॉक्स अँप फायदे व तोटे

अपस्टॉक्स मध्ये खाते उघडण्यापूर्वी, अपस्टॉकचे फायदे आणि तोटे जाणून घेणे आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. 

आपण थोडक्यात अपस्टॉक्स चे फायदे आणि तोटे पाहुयात.


अपस्टॉक्स चे फायदे - Benefits of Upstox in Marathi

  1. अपस्टॉक्सचे नवीन खाते उघडण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
  2. intraday ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी ट्रेड ब्रोकरेज प्रतिदिन 20 रुपये असते.
  3. सॉफ्टवेअर साठी वेगळे पैसे भरावे लागत नाही.
  4. एएमओ(After Market order), सीओ(closing offset), एसएल(Stop loss order), जीटीटी(Good Till Triggered) सह सगळ्या ऑर्डरचे प्रकार उपलब्ध आहेत.
  5. 40000 च्या स्लॅब साठी 20 रुपये प्रति दिन व्याजदराने  मार्जिन ट्रेडिंग सुविधा उपलब्ध आहे.
  6. शेअर्ससाठी मार्जिन उपलब्ध आहे.
  7. अपस्टॉक प्रो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आपल्याला निरीक्षण करण्यासाठी अनेक निर्देशक ऑफर करतो. ज्यावरून तुम्ही स्टोकचे एनालिसिस पाहू शकतात.


अपस्टॉक्स चे तोटे 

  1. स्टॉक डिलिव्हरी साठी ब्रोकरेज फी 20 रुपये प्रति ट्रेड आहे.
  2. स्टॉक टिपा किंवा शिफारसी देत नाही.
  3. ग्राहक सेवा पूर्ण दिवसासाठी उपलब्ध नसते.
  4. स्वयंचलित व्यापारासाठी API प्रवेश मिळत नाही.
  5. NRI ट्रेडिंग आणि डिमॅट खाते मिळत नाही.
  6. कॉल अँड ट्रेड फी प्रत्येक निष्पादीत ऑर्डर साठी 20 रुपये आहे.


अपस्टॉक खाते ऑनलाईन कसे उघडायचे? - How to open Upstox account in Marathi

जर तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला असेल तर तुम्हाला त्वरित Upstox चे ऑनलाईन खाते उघडता येते.

घरबसल्या ऑनलाईन अपस्टॉक खाते उघडण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

1) सर्वात आधी पुढील लिंकद्वारे upstox app डाउनलोड करा.

Download Here

२) अप्प ओपेन केल्यावर तुमचा इमेल आणि मोबाईल नंबर टाका.

३) ओटीपी आल्यावर व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण करा.

४) वैयक्तिक माहिती आणि बँक संबंधी माहिती टाका.

५) आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, स्वाक्षरी आणि छायाचित्र अपलोड करा.

६) अर्ज पुन्हा एकदा तपासा, पुष्टी करा आणि सबमिट करा.

७) तुमचे खाते पुढील 24 ते 48 तासात सक्रिय होईल. आणि कंपनी तुम्हाला ईमेल आणि एसएमएस द्वारे कळवेल.


तर मित्रहो या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत अपस्टॉक्स अँप मराठी माहिती - Upstox Information in Marathi शेअर केली. ज्यात अपस्टॉक्स या अँप विषयी महत्वाची माहिती, अँप चे फायदे व तोटे आणि अँप कसे डाउनलोड करावे याविषयी सांगण्यात आलेले आहे. आशा आहे आपणास ही माहिती उपयोगाची ठरली असेल. अपस्टॉक्स Download करण्यासाठी ची लिंक वर देण्यात आलेले आहे तेथून आपण हे app डाउनलोड करावे.


EmoticonEmoticon