Tuesday, 13 December 2022

इंस्टाग्राम फॉलोवर्स कसे वाढवावेत ? | How to Increase Followers on Instagram in Marathi

How to Increase Followers on Instagram in Marathi : हॅलो ! या पोस्ट मध्ये आपण इंस्टाग्राम चे फाॅलोवर्स कसे वाढवायचे या विषयावर माहिती घेणार आहोत. इंस्टाग्राम चे फाॅलोवर्स वाढवणे ही बऱ्याच लोकांची इच्छा असते. आणि सध्या तर खुप लोक इंस्टाग्राम चा वापर करत आहेत. काही लोक प्रसिद्ध होण्यासाठी, काही कुटुंब व मित्र-मैत्रिणीं सोबत कनेक्टेड राहण्यासाठी तर काही लोक आपला बिझनेस वाढवण्यासाठी इंस्टाग्राम चा उपयोग करत आहेत. आम्ही तुम्हाला आजच्या पोस्टमध्ये इंस्टाग्राम फाॅलोवर्स कसे वाढवायचे याबाबत माहिती देणार आहेत.‌



इंस्टाग्राम फाॅलोवर्स कसे वाढवायचे - How to Increase Followers on Instagram in Marathi

1 ) नियमित पोस्ट करा

जर तुम्हाला इंस्टाग्राम फाॅलोवर्स वाढवायचे असतील तर तुम्हाला इंस्टाग्राम वर नियमित पोस्ट करणे आवश्यक आहे. जर तुम्ही इंस्टाग्राम वर नियमित पोस्ट केलीत तर इंस्टाग्राम ला तुमचे अकाऊंट ॲक्टिव वाटेल आणि इंस्टाग्राम तुमच्या पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल. जेवढे लोक तुमचे पोस्ट बघतील तेवढे तुम्हाला फाॅलो करतील व तुमच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्स ची संख्या वाढेल.‌


2 ) लाइव्ह येत जा

तुम्हाला इंस्टाग्राम फाॅलोवर्स वाढविण्यासाठी इंस्टाग्राम वर लाइव्ह येणे गरजेचे आहे. इंस्टाग्राम वर लाइव्ह आल्यावर तुमच्या फाॅलोवर्स ची संख्या वाढण्यास मदत होते. रिसर्च च्या अनुसार, इंस्टाग्राम लाइव्ह व्हिडिओ ला अन्य व्हिडिओं च्या तुलनेत जास्त प्रोमोट करतो आणि तुमची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो . यामुळे तुमचे इंस्टाग्राम फाॅलोवर्स वाढण्यास मदत होते.


3 ) लोकांना आवडतील अशा पोस्ट करा

तुम्ही इंस्टाग्राम वर ज्या पोस्ट करता त्या लोकांना आवडणे गरजेचे आहे. लोकांना जेव्हा तुमच्या पोस्ट आवडतील तेव्हा ते तुम्हाला फाॅलो‌ करतील. यासाठी तुम्हाला थोडं रिसर्च कराव लागेल की तुम्ही कोणती पोस्ट केलीत तर ती लोकांना आवडेल आणि ते तुम्हाला फाॅलो‌ करतील. इंस्टाग्राम वर जास्तीत जास्त लोकांना ट्रेंडिंग गोष्टी बघायला आवडतात. तुम्हाला ज्या गोष्टी व्हायरल होत आहेत अशा गोष्टी शोधून पोस्ट करायला लागेल. अशी पोस्ट बघितल्यावर लोक तुमच्या पोस्ट ना लाइक आणि शेयर करतील. यामुळे तुमचे फाॅलोवर्स वाढतील.


4 ) पोस्ट मध्ये हॅशटॅग लावा

तुम्ही जेव्हा इंस्टाग्राम वर‌ पोस्ट कराल तेव्हा पोस्ट मध्ये हॅशटॅग जरूर लावा . हॅशटॅग लावताना तुमची पोस्ट ज्या विषयाची असेल त्या विषयाचा हॅशटॅग लावा . हॅशटॅग लावताना तुम्हाला #dailynews , #amazingfacts 

अशा प्रकारचे हॅशटॅग लावायचे आहेत . ज्या प्रकारची तुम्ही पोस्ट करता आणि त्याचे हॅशटॅग लावता तेव्हा ज्या लोकांना त्या विषयात आवड असेल किंवा जे लोक त्या विषयावरील पोस्ट बघत असतील त्यांच्या पर्यंत ती पोस्ट पोहोचेल . जर तुम्ही पदार्थांशी निगडीत पोस्ट करत असाल आणि तुम्ही #yummyfood , #foodie असे हॅशटॅग लावलेत तर जे लोक पदार्थांशी संबंधित पोस्ट बघत असतील त्यांच्यापर्यंत तुमची पोस्ट पोहोचेल . असे केल्याने तुमची पोस्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचते आणि तुमचे फाॅलोवर्स वाढतात . 



5 ) इंस्टाग्राम अकाऊंट ला प्रोफेशनल अकाऊंट मध्ये बदला

इंस्टाग्राम वर नाॅर्मल अकाऊंट वर तुम्हाला ॲड्स आणि अन्य फिचर्स मिळणार नाहीत . हे फिचर्स तुम्हाला प्रोफेशनल अकाऊंट वर मिळतील . तुम्हाला तुमच्या अकाऊंट वर ॲड्स आणि फिचर्स पाहिजे असतील तर तुम्हाला तुमच्या नाॅर्मल अकाऊंट ला प्रोफेशनल अकाऊंट मध्ये रूपांतरित करावं लागेल . यामुळे तुमचे फाॅलोवर्स वाढतील . प्रोफेशनल अकाऊंट साठी तुम्हाला इंस्टाग्राम च्या सेटिंग मध्ये जाऊन स्विच टू फ्रोफेशनल‌ अकाऊंट हा ऑपशन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे . यानंतर तुमचा नाॅर्मल अकाऊंट प्रोफेशनल अकाऊंट होईल . 


6 ) इंस्टाग्राम अकाऊंट चांगल्या प्रकारे सेटअप करा

तुम्हाला तुमचे फाॅलोवर्स वाढवायचे असतील तर तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंट ला चांगल्या प्रकारे सेटअप करा . सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम प्रोफाइल चांगला ठेवायला लागेल . जर तुमचा इंस्टाग्राम प्रोफाइल फोटो आकर्षक असेल तर लोक तुम्हाला फाॅलो करतील .‌ त्यानंतर तुम्हाला इंस्टाग्राम बायो चांगल्या प्रकारे लिहायला लागेल . तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंट साठी नाव सुद्धा चांगले ठेवायचे आहे . 


7 ) तुमच्या niche संबंधित लोकांना फाॅलो करा

तुम्हाला जो तुमचा niche असेल त्या संबंधित लोकांना फाॅलो करायचे आहे . तुम्ही फाॅलो केल्यानंतर ते देखील तुम्हाला फाॅलो बॅक‌ करतील . जर तुम‌च अकाऊंट Health संबंधित असेल तर तुम्हाला इंस्टाग्राम वर आणखी जे Health संबंधित अकाऊंट असतील त्यांना फाॅलो करायचे आहे . 


8 ) फेसबुक च्या मदतीने फाॅलोवर्स वाढवा

तुम्ही फेसबुक च्या मदतीने देखील फाॅलोवर्स वाढवू शकता . जर तुम्ही फेसबुक वापरत असाल तर तुम्ही फेसबुक च्या मदतीने इंस्टाग्राम फाॅलोवर्स वाढवू शकता . यासाठी तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम अकाऊंट फेसबुक द्वारे बनवायला लागेल . यामुळे तुमच्या फेसबुक लीस्ट मध्ये जे लोक ॲड असतील त्यांना त्यांच्या इंस्टाग्राम Suggestions मध्ये तुमचे अकाऊंट दिसेल व ते तुम्हाला फाॅलो‌ करतील . तुम्ही तुमचा इंस्टाग्राम अकाऊंट फेसबुक सोबत सुद्धा लिंक करू शकता व फेसबुक वर तुम्ही इंस्टाग्राम वर आहात हे पोस्ट करू शकता . असे केल्याने तुमचे फेसबुक फ्रेंड तुम्हाला इंस्टाग्राम ला फाॅलो करतील व तुमचे इंस्टाग्राम फाॅलोवर्स वाढतील .‌


वरील पोस्ट मध्ये आम्ही आपल्याला इंस्टाग्राम चे फाॅलोवर्स कसे वाढवायचे याबाबत माहिती दिली. आशा आहे How to Increase Followers on Instagram in Marathi ही पोस्ट आपल्यासाठी उपयोगाची ठरली असेल. धन्यवाद ! 


EmoticonEmoticon