Sunday, 12 September 2021

होस्टिंग म्हणजे काय ? वेब होस्टिंग मराठी माहिती | Web Hosting meaning in marathi

Hosting meaning in marathi : आजच्या या लेखात आपण वेब होस्टिंग काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आपण अनेकदा होस्टिंग बद्दल ऐकले असेल. परंतु होस्टिंग म्हणजे काय आणि तिचे कार्य काय आहे या बद्दलचे प्रश्न नेहमी आपल्या मनात येत असतील. 

म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही आपल्या करिता Hosting meaning in marathi म्हणजे वेब होस्टिंग ची मराठी माहिती ची माहिती घेऊन आलो आहोत.


Hosting meaning in marathi

वेब होस्टिंग काय आहे? (Web Hosting meaning in marathi)

वेब होस्टिंग म्हणजे काय तर कोणत्याही वेबसाईटला इंटरनेट वापरकर्त्या पर्यंत पोहचवण्यासाठी व ती ऑनलाईन दाखवण्याकरिता वेब होस्टिंग ची आवश्यकता असते. जेव्हा एखादी वेबसाईट अथवा ब्लॉग बनवला जातो, तेव्हा ब्लॉग वर असलेले content जसे फोटो, व्हिडिओ, टेक्स्ट इत्यादी सर्व सेव करण्यासाठी एका सर्वर ची आवश्यकता असते. आणि हा सर्व data ऑनलाइन ज्या सर्वर मध्ये एकत्रित केला जातो त्याला web hosting म्हटले जाते. 


Hosting meaning in marathi - Web hosting अथवा web server ला एक कॉम्प्युटर देखील म्हटले जाऊ शकते जे 24 तास इंटरनेट शी कनेक्टेड असते. आपणास वाटेल तर आपण स्वतः देखील आपल्या कॉम्प्युटरला सर्वर बनवून इंटरनेटच्या माध्यमाने वेबसाइट चा डेटा त्यावर होस्ट करू शकतो. परंतु यासाठी त्याबद्दलचे नॉलेज आणि 24 तास इंटरनेट सोबतच, मेंटेनन्स ची देखील आवश्यकता असते. जर थोडीदेखील तुमच्या सर्वर मध्ये समस्या आली तर संपूर्ण सिस्टम बंद पडू शकते आणि तुमची वेबसाईट डाऊन जाऊ शकते. 


म्हणून website hosting साठी नेहमी नामांकित कंपनीचा सर्वर वापरायला हवा. आजकाल अनेक कंपनीज वेब होस्टिंग ची सेवा देत आहेत. जसे GoDaddy, Hostinger, Hostgator, Bluehost, Digital ocean इत्यादी काही नामांकित hosting company मार्केट मध्ये आहेत.


अधिक वाचा 


Hosting चे प्रकार

इंटरनेटवर अनेक वेबसाईट अस्तित्वात आहेत. प्रत्येक वेबसाईट चे कार्य वेगवेगळे असते म्हणून प्रत्येक वेबसाईटला वेगवेगळ्या hosting ची आवश्यकता असते आणि म्हणूनच वेबसाईट वर येणाऱ्या यूजर ची संख्या, वेबसाईट चे कार्य आणि एका सर्वर वर असणाऱ्या एकूण वेबसाईट यानुसार hosting चे वेगवेगळे प्रकार आहेत. 


होस्टिंग चे 4 प्रमुख प्रकार पुढे देण्यात आले आहेत-

1) Shared Hosting 

ही होस्टिंग एक सामान्य होस्टिंग असते. जे लोक नवीन ब्लॉग बनवत आहेत व ज्यांच्या ब्लॉग वर सुरुवातीला ट्रॅफिक कमी असणार आहे अश्या लोकांसाठी shared Hosting उत्तम पर्याय आहे. 


शेअर होस्टिंग खरेदी करून आपण कमी पैशात स्वतः चा ब्लॉग सुरु करु शकतात. शेअर होस्टिंग मध्ये सर्वर ला लहान लहान भागांमध्ये वाटले जाते. ज्यामुळे एकाच सर्वर मध्ये अनेक वेबसाइट जोडल्या जाऊ शकतात. म्हणून जर वेबसाईट वर traffic जास्त जास्त असेल (म्हणजे एकाच वेळी भरपूर यूजर येत असतील) तर हि Hosting डाऊन जाण्याची देखील शक्यता असते. 


इंटरनेटवर अनेक कंपन्या कमी किमतीत Shared Hosting provide करीत आहेत परंतु कोणत्या कंपनीची hosting उत्तम राहील याबद्दलची माहिती पुढे पाहूया..


2) VPS Hosting

हा प्लॅन त्या लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांच्या वेबसाईटवर हजारोंच्या संख्येने विजिटर येतात. VPS Hosting Shared Hosting च्या तुलनेत अधिक शक्तिशाली असते.


VPS Hostingमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात रॅम, स्टोरेज, बँडविड्थ आणि प्रोसेसर मिळते ज्यामुळे मोठ्या संख्येने traffic आले तरी वेबसाईट डाऊन होत नाही.


3) Dedicated Server 

या प्रकारात तुम्हाला एका पूर्ण system चे सर्वर देऊन दिले जाते. या system मध्ये फक्त तुमचीच वेबसाईट असते आणि या संपूर्ण server वर तुमचाच अधिकार असतो. Hosting चा हा प्लान सर्वात महागडा असतो. 


हे सर्वर त्या लोकांसाठी असते जे मोठा बिजनेस चालवत आहेत आणि ज्यांच्या वेबसाईट वर एका सेकंदाला हजारोंच्या संख्येत लोक विजिट करीत आहेत.


4) Cloud Hosting

एखाद्या वेबसाईटला जेव्हा सर्वर वर होस्ट केले जाते तेव्हा त्या सर्वर ची लोकेशन फक्त एकाच जागी स्थित असते. ज्यामुळे दूर असलेला व्यक्ती जेव्हा तुमची वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला पेज ओपन होण्यास थोडा वेळ लागू शकतो. 


उदाहरण म्हणून जर तुम्ही भारताचे server घेतले आहे आणि तुमच्या वेबसाईटवर अमेरिका सारख्या देशातून विजिटर येत आहेत तर वेबसाईट चे सर्वर दूर असल्याने त्यांना website load होण्यास थोडा वेळ लागू शकतो. 


परंतु क्लाऊड होस्टिंग मध्ये सर्वर चा एक पूर्ण समूह असतो आणि वेगवेगळ्या जागी या होस्टिंग चे सर्वर स्थित असतात. यामुळे जर एखादा अमेरिकेचा व्यक्ती तुमच्या वेबसाईटवर येत असेल तर त्याला साईट चे content अमेरिकेत असलेल्या जवळच्या सर्वर वरून मिळून जाते व वेबसाईट लवकर लोड होऊन कंटेंट दिसू लागते. Cloud होस्टिंग ची स्पीड फार चांगली असते. जर आपण एकापेक्षा जास्त ब्लॉग बनवून ब्लॉगिंगला बिजनेस म्हणून सुरू करीत असाल तर ही Hosting तुमच्यासाठी उत्तम राहील. 


सर्वात चांगली होस्टिंग कोणती आहे ?

मित्रांनो जर आपण नवीन वेबसाइट सुरू करीत असाल तर भारतात सर्वात कमी किमतीत उपलब्ध असलेली होस्टिंग कंपनी hostinger ची होस्टिंग आपण खरेदी करू शकता. Hostinger च्या shared Plan ची किंमत 160 रुपये प्रतिमाह आहे, म्हणजे एका वर्षाचा आपणास 2000 पर्यंतचा खर्च येईल. यासोबतच या होस्टिंग प्लान मध्ये आपणास आपल्या आवडीचे एक डोमेन NameLifetime Free SSL मोफत देण्यात देईल. Hostinger होस्टिंग प्लान खरेदी, किमत व इतर माहिती पाहण्यासाठी पुढील बॅनर लिंक वर क्लिक करा.


Web Hosting meaning in marathi

तर मित्रहो आजच्या या लेखात आपण होस्टिंग म्हणजे काय - Web Hosting meaning in marathi या बद्दल माहिती मिळवली. आशा करतो की ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल आणि आपणही आता आपला स्वतःचा एक ब्लॉग बनवणार असाल.

जर आपण माझ्या videos च्या माध्यमाने ब्लॉगिंग शिकू इच्छिता तर तुम्ही माझ्या Blogging Ninja या यूट्यूब चॅनल ला देखील subscribe करू शकतात. Subscribe लिंक - Blogging Ninja धन्यवाद.. 


EmoticonEmoticon