Sunday, 14 January 2024

नेताजी सुभाष चंद्र बोस भाषण मराठी । Subhash Chandra Bose Speech in Marathi

नेताजी सुभाष चंद्र बोस भाषण मराठी | Netaji Subhash Chandra Bose Speech in Marathi

मित्रांनो भारतीय स्वतंत्र लढ्यातील एक प्रसिद्ध नाव नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे देशाच्या स्वातंत्र्यात मोलाचे योगदान आहे. नेताजींनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रजांना सळो की पडो करून सोडले होते.

सुभाष चंद्र बॉस यांची जयंती ही 23 जानेवारी तर पुण्यतिथि ही 18 ऑगस्ट ला असते. या दिवशी शाळा कॉलेज मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस भाषण दिले जाते. विद्यार्थी विविध पद्धतीने आपली भाषणे तयार करून आणत असतात. जर आपणही आपल्या विद्यालयात Subhash Chandra Bose Speech in Marathi देऊ इच्छिता तर हा लेख आपल्यासाठी फारच उपयोगाचा ठरणार आहे. पुढे आपणास नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावरील 2 मराठी भाषणे देत आहोत.


marathi speech on Subhash Chandra Bose

सुभाष चंद्र बोस जयंती भाषण मराठी - Subhash Chandra Bose Speech in Marathi

(450 शब्द) 

आज दिनांक 23 जानेवारी 2024, भारतीय स्वतंत्र लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारे क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा जन्म दिवस. आज आपण नेताजी सुभाष चंद्र बॉस यांची 127 वी जयंती साजरी करीत आहोत. 

आजच्या याच दिवशी ओडिसा राज्यातील  कटक शहरातले प्रसिद्ध वकील जानकी नाथ बोस व प्रभावती देवी यांच्या घरी 1897 साली सुभाष चंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण कटक मध्येच झाले. उच्च शिक्षणासाठी ते कलकत्ता विश्व विद्यालयात पोहोचले. कलकत्यात त्यांनी 1919 मध्ये प्रथम श्रेणीत बी ए ची परीक्षा उत्तीर्ण केली. 

नेताजींच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी सरकारी नोकरी करावी. आपल्या वडिलांची इच्छा म्हणून नेताजींनी आयएएस ची परीक्षा दिली व या परीक्षेत त्यांनी चौथा क्रमांक मिळवला. परंतु देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची भावना नेताजींच्या मनात लहानपणापासून ठसलेली होती. आणि म्हणूनच त्यांनी एक वर्षाच्या आतच आपल्या नोकरी चा राजीनामा दिला. आणि स्वतःला देश स्वतंऱ्याच्या कार्यात पूर्णतः झोकून दिले  गेले.

1941 साली नेताजी जर्मनी गेले. तेथे जाऊन त्यांनी जर्मनी चा तानाशाह अडोल्फ हिटलर याची भेट घेतली व भारतीय स्वातंत्र्यासाठी मदत मागितली. भारतातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी आझाद हिंद फौज ची स्थापना केली. त्यांनी तरुणांना आव्हान केले की "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुंगा". या नंतर 1943 मध्ये नेताजी जपान च्या मदतीने सिंगापूर ला पोहोचले. सिंगापूर मध्ये मोहन सिंह द्वारे बनवलेली इंडियन नॅशनल आर्मी ची कमान आपल्या हाती घेतली. सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूर मधून रेडिओ वर संबोधन करताना गांधीजींना पहिल्यांदाच भारताचे राष्ट्रपिता म्हणून सन्मान दिला.

सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या भाषणात देशाच्या जनतेला एक संदेश दिला होता. या भाषणात त्यांनी म्हटले होते "बंधू आणि भगिनींनो देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण जे युद्ध सुरू केले आहे, हे तोपर्यंत सुरू ठेवा जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नाही. धर्म पंथ आणि जात पात विसरून एकत्रित व्हा.

साल 20 जुलै 1921 मध्ये नेताजींनी महात्मा गांधीची भेट घेतली व वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभाग घेत राहिले. या दरम्यान एकदा बंगाल मध्ये महापूर आला. नेताजींनी शिबिरे लावून प्रभावित लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटणे सुरू केले. समाजसेवेच्या या कार्यासाठी त्यांनी 'युवक दलाची' स्थापना केली.

इंग्रज शासनाद्वारे जेव्हा भगत सिंह यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा नेताजी महात्मा गांधी यांच्या कडे गेले व त्यांनी भगत सिंह यांची शिक्षा रद्द करण्यासाठी आंदोलनाची विनंती केली. परंतु महात्मा गांधी हिंसेच्या विरोधात असल्याने त्यांनी नेताजी यांच्या या विनंती कडे दुर्लक्ष केले. या प्रसंगामुळे नेताजी हे गांधीजी व काँग्रेस च्या कार्यपद्धतीने नाराज झाले. 

सुभाष चंद्र बोस यांनी 'दिल्ली चलो' चा नारा दिला. परंतु 18 ऑगस्ट 1945 मध्ये एका विमान दुर्घटने दरम्यान त्याची मृत्यू झाली. नेताजींच्या मृत्युनंतर त्यांचे शरीर सापडले नाही. यामुळे त्यांच्या मृत्युच्या कारणावर आज देखील विवाद सुरू आहेत. परंतु या सर्वांमध्ये ही गोष्ट सत्य की भारतीय स्वतंत्र लढ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे योगदान मोलाचे होते. आज आपण भारतीय जी जय हिन्द ची घोषणा करतो, ते घोषवाक्य देखील नेताजींनीच दिलेले आहे. देशासाठी आपले संपूर्ण जीवन व प्राण अर्पण करणाऱ्या महान नेत्यास माझे शतश नमन..! जय हिंद जय भारत.

***


सुभाष चंद्र बोस जयंती भाषण मराठी - Netaji Subhash Chandra Bose Speech in Marathi

अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार.

आज मी तुमच्याशी एक अश्या नेत्यांबद्दल बोलणार आहे ज्यांनी मला सर्वात जास्त प्रेरित केले आहे. त्या महान नेत्याचे नाव आहे सुभाष चंद्र बोस.

सुभाष चंद्र बोस हे प्रभावशाली आणि क्रांतिकारी नेता होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात महत्वाची कामगिरी बजावली. भारतीय स्वतंत्रता युद्धात त्यांनी भारताबाहेर जाऊन आझाद हिंद फौज स्थापित केली. त्यांचे विचार क्रांतिकारी होते. 

सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 साली ओडिसा राज्यातील कटक शहरात एका बंगाली हिंदू कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस तर आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते. सुभाष चंद्र बोस हे कोलकाता विश्व विद्यालयातून पदवीधर झाले. या नंतर ते इंग्लंड ला गेले व तेथे सरकारी नोकरी ची तयारी करू लागले. सिव्हिल सर्व्हिस च्या या परीक्षेत ते चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. परंतु देशभक्ती आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती. एप्रिल 1921 मध्ये त्यांनी इंग्लंड मधील नागरिक सेवेतून राजीनामा दिला व ते परत भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग घेतला. त्यांनी बंगाल आणि बंगालच्या आजूबाजूच्या परिसरातील युवकांना एकजूट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांचे विचार गांधीवादी विचारां पेक्षा वेगळे होते. सुभाष चंद्र बोस इंग्रजांच्या अत्याचारी शासनाच्या विरोधात सशस्त्र क्रांती चे समर्थक होते. 1939 मध्ये जेव्हा द्वितीय महायुद्ध सुरू झाले. तेव्हा इंग्रजांनी त्यांना कोलकत्यात नजरबंद केले. परंतु सुभाष चंद्र बोस हे त्यांचा भाचा शिशिर कुमार बोस यांच्या मदतीने नजरकैदेतून बाहेर पडले. अफगाणिस्तान व सोव्हिएत संघाच्या मार्गाने ते जर्मनी गेले. जर्मनीत नेताजी हिटलर ला पण भेटले. या नंतर सिंगापूर ला जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेचे गठण करण्यास सुरुवात केली.

नेताजी आपल्या आझाद हिंद फौज सोबत 4 जुलै 1944 ल बर्मा पोहोचले. इथेच त्यांनी आपला प्रसिद्ध नारा, "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा" दिला.

18 ऑगस्ट 1945 ला टोकियो जाताना तैवान जवळ हवाई दुर्घटने दरम्यान नेताजींचा मृत्यू झाला, परंतु त्यांचे मृत शरीर मिळाले नाही. म्हणूनच नेताजींच्या मृत्यूच्या कारणांवर आज देखील विवाद सुरू आहे.

***


तर मित्रहो वर आपणास नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावरील मराठी भाषण दिलेले आहे. आम्ही आशा करतो की Subhash Chandra Bose Speech in Marathi आपणास नक्कीच उपयोगाचे ठरले असेल. वरील भाषणाला जसेच्या तसे उपयोगात घेण्याएवजी आपण त्यात आपल्या पद्धतीने योग्य सुधारणा व इतर पॉइंटस वाढवून आपले स्वत चे भाषण तयार करू शकतात.

Saturday, 6 January 2024

स्वामी विवेकानंद जयंती भाषण । Swami Vivekananda Jayanti Speech in Marathi

स्वामी विवेकानंद जयंती स्पीच। स्वामी विवेकानंद भाषण मराठी। Swami Vivekananda Jayanti Speech bhashan in marathi.

swami vivekananda Yuva Din bhashan Marathi : स्वामी विवेकानंद एक महान संत, विचारवंत आणि आध्यात्मिक गुरु आहेत. विवेकानंदांनी ध्यान व योग च्या माध्यमाने भारतीय संस्कृति चे पुनरुत्थान केले. त्यांनी जगभरात भारतीय संस्कृतिचा प्रसार केला. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी स्वामी विवेकानंद जयंती चे स्वामी विवेकानंद भाषण मराठी घेऊन आलेलो आहोत.

12 जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंदांचा वाढदिवस हा युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या शुभप्रसंगी शाळा कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांवर मराठी भाषण देण्यास सांगितले जाते. येथे आम्ही आपल्यासाठी swami vivekananda speech in marathi दिलेले आहे ज्याचा उपयोग आपण करू शकतात.



स्वामी विवेकानंद जयंती भाषण मराठी - Swami Vivekananda Jayanti Speech in Marathi

आज प्रत्येक भारतीय स्वामी विवेकानंदांना त्यांचे व्यक्तिमत्व व महान अध्यात्मिक विचारांमुळे ओळखतो. स्वामी विवेकानंद यांनी विश्वभरात सनातन धर्म आणि भारतीय संस्कृति चा प्रचार प्रसारा करून जगाला भारतीयांची ओळख करून दिली. त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना सुद्धा केली. आज मी तुम्हाला महान व्यक्तिमत्व असलेल्या स्वामी विवेकानंदाबद्दल दोन शब्द सांगणार आहे.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला कोलकत्यात झाला. तो दिवस मकरसंक्रांतीचा होता. त्यांचे जन्म नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्यांचे वडील श्री विश्वनाथ दत्त हे कोलकत्यातील प्रसिद्ध व नामांकित वकील होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवी ही बुद्धी मती आणि सात्विक स्त्री होती. नरेंद्राची आई, कथा खूप छान सांगत असे. रामायण महाभारत या महाकाव्यातील कथा आणि पुराणातील कथा नरेंद्रना आईकडूनच समजल्या. नरेंद्रानी आईच्या इतर गुणासोबत तिच्या उत्तम स्मरणशक्तीच्या वारसाही घेतला होता. नरेंद्र लहानपणापासून अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे होते. ते सुंदर गात असत, विविध खेळांमध्ये ते प्रवीण होते, शीघ्र विनोदबुद्धी त्यांच्याजवळ होती, त्यांचे ज्ञान चौफेर होते. त्यांच्यात नेतृत्वाचे गुण नैसर्गिकपणे वसत होते आणि विविध विषयात त्यांचे नैपुण्य असल्याने लोकांना ते फार भावत असत.

मेट्रोपोलिटिअन इन्स्टिट्यूटमधून त्यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि जनरल असेंबली इन्स्टिट्यूशन मधून एफ ए आणि बीए च्या परीक्षा पास केल्या. अभ्यासात तत्वज्ञान या विषयाला त्यांचे प्रथम प्राधान्य होते. तत्वज्ञानाचे विद्यार्थी असल्याकारणाने त्यांच्या मनात ईश्वर विषय प्रश्न सतत उठत असत. देव आहे का? देव असेल तर मग कसा असेल? माणसाचे आणि ईश्वराचे परस्पर संबंध कशा प्रकारचे असतील? ज्या सृष्टीत इतका विरोधाभास जाणवत असतो की खरोखर ईश्वराने निर्माण केली आहे का? असे एक ना अनेक प्रश्न नरेंद्र यांच्या मनात येऊ लागले. एकदा त्यांच्या एका नातेवाईकांनी नरेंद्र यांना सुचवले की त्यांनी दक्षिणेश्वराला असणाऱ्या श्रीराम कृष्णाची भेट घ्यावी तेथेच त्यांच्या धर्मविषयक सर्व शंकांचे निरसन होईल. यानंतर एक दिवस नरेंद्रनाथ दक्षिणेश्वराला गेले आणि त्यांनी 'आपण ईश्वर बघितला आहे का?' असा सरळ प्रश्न श्रीरामकृष्णांना विचारला. त्यावर श्रीराम कृष्ण म्हणाले की त्यांनी ईश्वराला बघितले आहे आणि नरेंद्राची इच्छा असेल तर त्यालाही ते ईश्वरदर्शन घडवू शकतात. श्रीरामकृष्णांची सरलता आणि ईश्वरी अनुराग बघून नरेंद्र प्रभावित झाले. आतापर्यंत त्यांनी जितकी माणसे पाहिली होती त्यात श्रीरामकृष्ण हे एकमेव असे व्यक्ती होते की ज्यांनी स्वतःला जिंकले होते. नरेंद्रणी यथावकाश भगवान श्रीरामकृष्ण यांचा गुरु या नात्याने स्वीकार केला.

1886 साली श्रीरामकृष्णना घशाचा कर्करोग झाला आणि यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. यानंतर नरेंद्र संन्यास धारण करून भ्रमंतीसाठी यात्रा करू लागले. नरेंद्रनाथांनी संन्यास ग्रहण करून स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले.  स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण भारत देशात भ्रमण केले. त्यांनी खेड्यापाड्यातील अडाणी लोक बघितले, त्यांच्या अंधश्रद्धा पाहिल्या, ते लोक अर्धपोटी असत व जातिभेदाच्या जुलमाचे बळी होते. त्यांची ही अवस्था पाहून स्वामीजींना धक्का बसला. समाजाला हलवून जागे करणे किती आवश्यक आहे ही गोष्ट स्वामीजीच्या मनावर ठसून गेली. त्यांनी समाज शिक्षणाची गरज जाणली. म्हैसूरच्या राजाने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात प्राथमिक शिक्षण मोफत केले. शेतकऱ्यांच्या दारापर्यंत शिक्षण पोहोचावे व जास्तीत जास्त लोक शिक्षित व्हावे अशी स्वामीजींची इच्छा होती.

 बुद्धीची वर्गातील अनेक लोक स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊ लागले. मद्रासच्या काही तरुणांनी स्वामीजींच्या आदर्शासाठी आपले जीवन अर्पण केले आणि स्वामीजींच्या यशात या तरुणांचा सहभाग फार मोठा होता.  त्या काळात भारतीय पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करुन त्याला महत्त्व देऊ लागले. सुशिक्षित भारतीय तरुण पाश्चिमात्त्य पेहराव घालून मिरवत असत, इंग्रजांनी प्रमाणे शिष्टाचार पाडीत असत आणि पाश्चिमात्य असल्याप्रमाणे वागत असत. या गोष्टीचे स्वामीजींना फार दुःख झाले नंतरच्या काळात आपल्या देशाला संबोधून स्वामीजी म्हणाले होते.  भारतीयांन पश्चिमात्य कडून विज्ञान व तंत्रज्ञान शिकावे, त्यांचे संघटन शिकावे आणि व्यावहारिक दृष्टी पण घ्यावी पण हे सर्व करताना आपली उच्च मूल्य आणि अध्यात्मिक आदर्शांचा विसर पडू देऊ नका.

मद्रास मध्ये असताना अमेरिकेत होत असलेल्या सर्वधर्मपरिषदेत स्वामीजींनी जावे, व तेथे हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करावे अशी विनंती मद्रासमधील तरुणांनी केली. या कार्यासाठी तरुणांनी निधी गोळा करण्यास सुरुवात केली. स्वामीजींनी प्रथम अमेरिकेतील शिकागो आणि नंतर इंग्लंडच्या जनतेवर प्रचंड प्रभाव निर्माण केला. 'भारताच्या प्राचीन नीतिमूल्यांचा उद्गाता' म्हणून वृत्तपत्रानी त्यांना उच्च मानवंदना दिली. एका रात्रीतच ते भारताचे राष्ट्रीय नेता म्हणून प्रसिद्ध झाले. यानंतर हळूहळू भारतीय सुशिक्षितांचे आपल्या भारताबाबत आणि आपल्या संस्कृतीबद्दल मत परिवर्तन होण्यास सुरुवात झाली.  आपण भारतीय लोक धर्म क्षेत्रात, तत्त्वज्ञानात,कलेत आणि साहित्यात मागासलेले तर नव्हतेच उलट विदेशी लोकांपेक्षा जास्त प्रगत आहोत असा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण झाला. भारतीय अस्मितेच्या जागृतीचा तो एक क्षण होता.

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांपासून त्यानंतर अनेक राष्ट्रीय पुढाऱ्यांनी स्वामी विवेकानंदन पासून स्फूर्ती प्राप्त केली. दीनदुबळ्या गरीब समाजाची भारताने केलेली उपेक्षा हे भारतीयांचे राष्ट्रीय पाप आहे असे स्वामीजी म्हणत असत. महिला वर्गाची उपेक्षा आणि अवहेलना हे दुसरे राष्ट्रीय पाप आहे. जातिव्यवस्थेला आज प्राप्त झालेले रूप हे सुद्धा पापच होय. स्वामीजींना समाजवादाचे भारतातील आगमन जाणवले होते. त्यांनी जगातील इतर देशांप्रमाणे त्याचे स्वागतही केले. स्वामीजींनी ब्राह्मणांना सांगितले की भारतीय संस्कृतीच्या आणखी पतन होऊ नये म्हणून देश अध्यात्मिक विचारांनी भारला जाणे आवश्यक आहे. भारतात नवीन सामाजिक रचना आणि नूतन सभ्यता निर्माण होईल ही स्वामीजींना अशा होती.

 स्वामीजींनी त्यांच्या जीवनाचे अखेरचे दिवस बेलूर मठात घालवले. महासमाधी पूर्वी तीन दिवस ते प्रेमानंदांबरोबर फिरत होते. एका जागे कडे बोट दाखवून स्वामीजी त्यांना म्हणाले, "माझ्या देहत्यागानंतर माझ्यावर येथे संस्कार करा." त्याच जागेवर आज विवेकानंदांचे मंदिर उभे आहे. 4 जुलै 1902 अखेरचा दिवस उजाडला. ते सकाळीच मंदिरात गेले. मंदिराच्या सर्व खिडक्या व दारे लावून घेतली. सुमारे तीन तास त्यांनी आत मध्ये ध्यान केले. त्यानंतर त्यांनी जगन मातेचे एक भजन गायले. खाली येऊन थोडावेळ फेऱ्या मारल्या. दिवसभर आपले रोजचे कार्य केले यानंतर त्यांनी साधूंशी काही वेळ चर्चा केली. संध्याकाळी ते बिछान्यावर जाऊन पडले. शिष्याने थोडा वेळ वारा घातला आणि मग तो त्यांचे पाय चेपू लागला. स्वामीजी झोपले आहेत असे त्याला वाटले. एकदा त्यांचा हात किंचित हलला. दोनदा त्यांनी दीर्घ श्वास घेतला. शिष्याला काहीतरी चमत्कारिक वाटू लागले. त्याने धावत जाऊन एका साधूला बोलावले. साधू येऊन पाहू लागला त्याला स्वामीजींची नाडी लागेना.  श्वासही थांबल्याचे जाणवले. स्वामीजींची महासमाधी झाली घड्याळात नऊ वाजून काहीतरी मिनिटे झालेली होती. swami

***

वाचा> स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण जीवन चरित्र


तर मित्रांनो आपणास स्वामी विवेकानंद भाषण मराठी (speech on swami vivekananda in marathiकसे वाटले, आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद..


अधिक वाचा:

Wednesday, 3 January 2024

राजमाता जिजाऊ जिजामाता मराठी निबंध | Jijabai/Jijamata essay in marathi

जिजामाता निबंध - rajmata jijau nibandh in marathi : वीरांची भूमी असलेल्या आपल्या देशात अनेक वीर घडले. ज्याप्रमाणे पुरुषांनी आपल्या सहासाने पराक्रम घडवले त्याच पद्धतीने देशातील अनेक स्त्रियांनी देखील मोठ्या धैर्याने पराक्रमी साहस दाखवले आहे. 

आपल्या देशातील वीरांगनां मध्ये शिवरायांच्या आई जिजामातांचा देखील समावेश केला जातो. जिजामाता यांनी शिवरायांवर जे संस्कार केले त्याचेच फलस्वरूप शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. 

आजच्या या लेखात आपण Jijamata essay in marathi अर्थात राजमाता जिजाऊ निबंध किंवा जिजामाता मराठी निबंध पाहणार आहोत. तर चला सुरू करूया..


Jijamata essay in marathi

जिजामाता मराठी निबंध - Jijamata essay in marathi

(300 शब्द)

राजमाता जिजाऊ यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे होते. जिजाबाई यांना आपण जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मांसाहेब इत्यादि नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली झाला. सिंधखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील आणि म्हाळसाबाई या त्यांच्या आई होत्या. 

1605 साली जिजाबाईंचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्य होती. ज्यात सहा मुली व दोन मुले होती. त्यांनी थोरल्या मुलाचे नाव संभाजी असे ठेवले. तो शहाजी राजांजवळ वाढला आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर जिजाबाईंना दूसरा मुलगा झाला, या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. ज्यांना आज आपण छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखतो. 

शिवाजी राजांच्या संगोपणाची संपूर्ण जवाबदारी जिजाबाइंवर होती. शिवाजी महाराज 14 वर्षाचे असतांना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याच्या जहागीरीची जवाबदारी सोपवली. अर्थातच शिवाजी महाराज लहान असल्याने या जहागिरीची जवाबदारी जिजमातांवर आली. जिजबाईंनी शिवरायांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि युद्धाच्या गोष्टी सांगणे सुरू केले. जिजामातांनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवराय घडले व त्यांनी आपल्या हातून स्वराज्य घडवले. शिवरायांच्या मनात कर्तुत्वाची जाणीव निर्माण करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीति शिकवली. शेजारी बसवून राजकारणाचे अनेक घडे देखील दिले. 

समान न्याय देण्याची वृत्ती, धाडस, चिकाटी, स्वराज्य प्राप्त करण्याची जिद्द आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस त्यांनी शिवरायांना दिले. शिवराय मोठ्या मोहिमेवर असतांना जिजाबाई राज्यकारभार चालवत असत. सिंहासनावर बसून स्वतः तंटे सोडवत असत आणि अन्याय करणाऱ्याला दंड देत असत,  शहाजीराजे बंगळूर ला वास्तव्यास असतांना शहाजीराजांच्या आई व वडिलांची जवाबदारी देखील जिजामातांवर येऊन पडली. ही जवाबदारी देखील त्यांनी मोठ्या कौशल्याने पार पाडली. 

राजाच्या सर्व स्वऱ्यांच्या व लढायांचा तपशील जिजामाता ठेवत असत. शिवाजीराजे आगऱ्यात कैद असतांना राज्याची संपूर्ण जवाबदारी उतारवयातही जिजामातेवर येऊन पडली, ही जवाबदारी देखील त्यांनी पार पाडली.  शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून 17 जून 1674 साली त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी त्यांचे निधन झाले, 

स्वराज्याचे स्वप्न प्रत्येकक्षात साकारन्यासाठी जिजाबाई या छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम आशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता होत्या. आशा या मातेस शतशः नमन.

***


जिजामाता संपूर्ण मराठी माहिती << वाचा येथे


जिजामाता निबंध : तर मित्रहो हा होता राजमाता जिजाऊ मराठी निबंध (Jijamata essay in marathi). राजमाता जिजाऊ निबंध आपणास उपयोगी ठरला असेल अशी आशा आहे. हा मराठी निबंध आपणास कसा वाटला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद...

Tuesday, 2 January 2024

सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी | Savitribai Phule Bhashan Speech Marathi

सावित्रीबाई फुले भाषण मराठी - savitribai phule speech in marathi : मित्रानो भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची आज 191 वी जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिला अधिकार व महिला शिशु हत्या रोकण्यासाठी अभियान चालवले होते. त्यांनी नवजात कन्या शिशुंसाठी आश्रम पण उघडले. 

एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतः शिक्षित होऊन समाजाच्या कुरीतीना संपवले आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे पण उघडून दिलीत. सावित्रीबाई या समजाची पर्वा न करता आपले कार्य करीत राहिल्या त्यांच्या या कार्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी सुद्धा खूप मदत केली. 

आज आम्ही तुमच्यासाठी सावित्रीबाई फुले माहिती, Savitribai phule bhashan व सावित्रीबाई फुले यांचे  भाषण देणार आहे. तर चला सुरू करूया.. 


सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी savitribai fule

सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी - Savitribai phule bhashan in marathi

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी, 1831 साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगांव येथील दलित कुटुंबात झाला. त्यांचा वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. 1840 साली नऊ वर्षाच्या वयात त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी लावण्यात आले. ज्योतीराव फुले हे एक सामाजिक कार्यकर्ता होते. ज्या वेळी सावित्रीबाईंचे लग्न झाले तेव्हा त्यांचे काहीही शिक्षण झाले न होते. सावित्रीबाईंच्या समाज कार्यात जोतिबाची त्यांना भरपूर साथ मिळाली. त्यांनी सावित्रीबाईंना घरातच शिकवणे सुरू केले. जोतिबांच्या या कार्याला सावित्रीबाईंच्या वडिलांचा विरोध होता, पण तरीही जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकवणे सुरू ठेवले. या नंतर त्यांनी सावित्रीबाईंचे एडमिशन एका विद्यालयात केले. समाजातील लोक याला विरोध करू लागले. पण त्या कडे लक्ष न देता सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पूर्ण केले. 


शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या स्त्री शिक्षणासाठी कार्य करायला लागल्या. ज्योतिबा फुलेंच्या सहकार्याने त्यांनी वर्ष 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिले विद्यालय सुरू केले. या शाळेत त्या काळात केवळ 9 मुलींनी प्रवेश घेतला. सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्या काळात दलित व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार न होता. ज्या वेळी सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असता तेव्हा रस्त्यांना जात असताना लोक त्यांच्यावर शेण व कचरा फेकत असतं. तरीही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. ज्योतिबा फुले यांना समाजातील इतर लोकांद्वारे धमक्या मिळू लागल्या, या धमक्यांना घाबरून जोतिबांच्या वडिलांनी त्यांना घरातून काढून दिले. 


सावित्रीबाई फुले या देशाच्या प्रथम महिला महिला मुख्यद्यापिका आणि नारी मुक्त आंदोलनाच्या नेता होत्या. एकणाविसव्या शतकात त्यांनी अस्पृश्यता, सतीप्रथा, बाल विवाह, विधवा विवाह ई. क्रुरिती विरुद्ध सुद्धा कार्य केले. सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्या करायला जात असलेल्या एक गर्भवती विधवा ब्राह्मण महिला, काशीबाई ह्यांना वाचवून आपल्या घरी डिलिवरी केले. त्यांचा मुलगा यशवंत याला आपला दत्तक पुत्र म्हणून मोठे केले. 10 मार्च 1897 साली ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला. जोतिबांच्या राहिलेल्या कार्याला पूर्ण करणे सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य समजले. आपले पूर्ण आयुष्य त्यांनी दलित व वाचीतांच्या अधिकारांसाठी घालून दिले. 1897 साली देशात प्लेग ची साथ पसरली होती. सावित्रीबाई या प्लेग च्या रुग्णांची पूर्ण श्रध्देने सेवा करीत होत्या. प्लेग संक्रमित लोकांची सेवा करीत असतानाच त्यांनाही प्लेग झाला व 10 मार्च 1897 ला प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले. आज जगात वाढत असलेल्या स्त्री सशक्तीकरणाची सुरुवात सावित्रीबाई व जोतिबांच्या प्रयत्नामुळेच संभव होती. अश्या या महान समाज सुधारकांना माझा प्रणाम.

--समाप्त--


मित्रानो हे होते सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी मध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले भाषण मराठी - savitribai phule speech in marathi कसे वाटले आम्हाला कंमेंट च्या माध्यमाने कळवा. आणि लक्षात असू द्या मराठी भाषणे व निबंधांसाठी भेट द्या www.bhashanmarathi.com. 

Monday, 25 December 2023

माझी शाळा निबंध मराठी | My School Essay in Marathi

माझी शाळा निबंध मराठी | My School Essay in Marathi

Majhi Shala Nibandh: मित्रहो आज आपण माझी शाळा या विषयावरील काही सुंदर निबंध मराठीतून प्राप्त करणार आहोत. या निबंधात आपणास एक विद्यार्थ्याच्या शाळेचे वर्णन देण्यात आलेले आहे. येथे देण्यात आलेल्या माझी शाळा निबंध द्वारे आपण आपल्या स्वतः च्या शाळेचे वर्णन करणार निबंध लिहू शकतात.


Majhi Shala Nibandh Marathi
Majhi Shala Nibandh

माझी शाळा 10 ओळी निबंध | 10 Lines on My School in Marathi 

  1. माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा माध्यमिक विद्यालय आहे.
  2. माझी शाळा आमच्या शहरातील प्रसिद्ध शाळांमधून एक आहे.
  3. माझ्या शाळेची इमारत खूप सुंदर आणि भव्य आहे.
  4. माझ्या शाळेच्या समोर मोठेच मैदान आहे, या मैदानावर आम्ही विविध खेळ खेळतो.
  5. माझे शाळेत अनेक मित्र आहेत, ज्यांच्या सोबत मी अभ्यास व खेळ खेळतो. 
  6. माझ्या शाळेचे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी करतात आणि स्वभावाने ते खूप दयाळू देखील आहेत. 
  7. माझ्या शाळेत सर्व राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
  8. माझ्या शाळेत मोठेच ग्रंथालय आहे, जेथे अभ्यासाची व अभ्यासाव्यतिरिक्त इतर माहितीची पुस्तके मिळतात.
  9. माझ्या शाळेत आठवड्यातून एकदा शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. 
  10. घरापासून माझ्या शाळेचे अंतर एक किलोमीटर आहे.
  11. मला दररोज शाळेत जायला आवडते, कारण येथे मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.


1) माझी शाळा निबंध मराठी | My School Essay in Marathi 

(200 शब्द)

शाळेला विद्यालय व इंग्रजीत स्कूल पण म्हटले जाते. शाळा असे स्थान आहे जेथे विद्यार्थ्याना शिक्षण दिले जाते. शाळा विद्यार्थ्याच्या भविष्याला उज्वल बनवते. माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्या मंदिर आहे व या शाळेत दूर दुरून मुले शिक्षण घ्यायायला येतात. मला माझी शाळा खूप आवडते. 

माझ्या शाळेत एकूण 50 वर्ग आहेत आणि जवळपास 60 शिक्षके आहेत. 32 सहायक शिक्षक, एक प्राचार्य आणि 15 गेट कीपर आहेत. माझ्या शाळेतील मुख्यध्यापकाचा रूम विशेष पद्धतीने सजवलेला आहे. त्या रूममध्ये महात्मा गांधी सारख्या महान नेत्याचे फोटो लावलेले आहेत. या शिवाय कर्मचाऱ्यासाठी वेगळा रूम, ग्रंथालय, संगणक कक्ष आणि प्रयोग शाळा आहे. 

माझ्या शाळेतील ग्रंथालयात नव्या व जुन्या पुस्तकाना संग्रहित केले आहे. या मध्ये साहित्य, पाककला, इतिहास, विज्ञान, भूगोल इत्यादि पुस्तके उपलब्ध आहेत. माझ्या शाळेचा वेळ सकाळी 7 वाजेपासून 1:30 पर्यन्त असतो. दुरून येणाऱ्या विद्यार्थी साठी स्कूल बस ची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी प्रार्थना सोबत शाळेची सुरुवात होते. माझी शाळा व शाळेतील सर्व शिक्षक शिस्तप्रिय आहेत, नियमांचे पालन न करणाऱ्या विद्यार्थीनां शिक्षा केली जाते. 

कोणत्याही विद्यार्थी च्या जीवनात शिक्षक व शाळेचे महत्व अनन्यसाधारण असते. माझ्या शाळेचे शिक्षक धैर्य आणि प्रेमाने आम्हाला शिकवतात. कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान आम्हाला शाळेमध्ये दिले जाते. इत्यादि अनेक कारणामुळे मला माझी शाळा खूप आवडते.

***



2) माझी शाळा निबंध मराठी | Mazi Shala Nibandh Marathi 

(300 शब्द)

माझ्या शाळेचे नाव प्रताप विद्यामंदिर आहे. माझी शाळा एक आदर्श विद्यालय आहे. येथे शिक्षण, खेळ व इतर शैक्षणिक सुविधा उत्तम तऱ्हेने उपलब्ध आहेत. येथील वातावरण देखील शांत व निसर्ग रम्य आहे. शिक्षणाच्या बाबतीत माझी शाळा शहरातील उत्कृष्ट शाळांपैकी एक आहे. 

माझ्या शाळेत इयत्ता 6 वी पासून 10 वी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. शाळेची 2 मजली भव्य इमारत आहे. यात जवळपास 50 खोल्या आहेत. प्रत्येक वर्गात कॅमेरा, फर्निचर, पंखे इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. या शिवाय प्रार्थना हॉल, स्टाफ रूम, सभागृह, ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब, प्रयोग शाळा ई. वेगवेगळे वर्ग आहेत. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टर व थंड पाणी उपलब्ध आहे. स्वच्छ शौचालयाची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वेगवेगळी झाडे लावण्यात आली आहेत. माळी काका या वृक्षांची खूप काळजी घेतात.

माझ्या शाळेत जवळपास दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांची संख्या 30 आहे, याशिवाय झाडांच्या साफ सफाई साठी एक माळी, शाळेच्या स्वछतेसाठी 3 कर्मचारी, दोन वॉचमन आणि ऑफिस कामासाठी क्लर्क सोबत इतर स्टाफ पण आहे. आमचे सर्वच शिक्षक शिस्त प्रिय आहेत. शिक्षकांच्या नेतृत्व मुळे माझी शाळा दिवसेंदिवस प्रगती करीत आहे.  

आमच्या इयत्ता 7 वीच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 60 आहे. माझ्या वर्गात माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही सर्वजण सोबत खेळतो तसेच अभ्यास करतो. आमच्या वर्गात बसण्यासाठी बाकांची खूप छान व्यवस्था करण्यात आली आहे. जास्त दाटीवाटी न करता मोकळे बसण्यासाठी मोठे बाक लावण्यात आले आहेत. दररोज एक शिपाई काका या बाकांची धूल पुसून स्वच्छ करतात. 

माझ्या शाळेत अभ्यासाशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी सुद्धा दिली जाते. विद्यार्थी व विद्यार्थिनी बाल दिवस, स्वतंत्र दिवस, प्रजासत्ताक दिन, लोकमान्य टिळक पु्यतिथी, महात्मा गांधी जयंती अश्या विविध दिवशी भाषणे देखील देतात. या शिवाय शाळेत विवध विषयांवर वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामुळे आमच्यात प्रमाणिकता, सहयोग, आनंद, शिस्त, नेतृत्व ई. गोष्टींचा विकास होतो. 

माझ्या शाळेत सर्व काही व्यवस्थित व शिस्तपूर्ण आहे. शिक्षणाच्या बाबतीत माझी शाळा  नंबर एक आहे. मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे आणि मला माझी शाळा खूप खूप आवडते.

***



3) माझी शाळा निबंध मराठी | Majhi Shala Nibandh 

(400 शब्द)

माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा माध्यमिक विद्यालय आहे. माझी शाळा  साताऱ्यात आहे, शाळेच्या खूप साऱ्या शाखा आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी माझ्या शाळेची वेगळीच ओळख आहे. माझ्या या शाळेचे बांधकाम अशा पद्धतीने केले आहे की बघताना अतिशय सुंदर व मनमोहक वाटते. 

शाळेचे वातावरण इतके शांत आणि सकारात्मक आहे की मला कायम जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असते. माझ्या घरापासून शाळा 2 किलो मीटर च्या अंतरावर आहे, म्हणून मी दररोज शाळेच्या बस मध्ये बसून शाळेत जातो. शहरातील प्रत्येक ठिकाणी मुलांना न्यायला स्कूल बस पाठवली जाते. माझी शाळा शहरापासून थोड्या दूर आहे. शाळेची ही जागा प्रदूषण मुक्त व अतिशय शांत आहे. 

कस्तुरबा शाळेची इमारत 3 मजली आहे, ज्यात तीनही मजल्यांवर मोठ मोठे वर्ग आहेत आणि प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांच्या सुविधेचा विचार करून व्यवस्थित काम करण्यात आले आहे. शाळेचे फक्त वर्गचं नाही तर प्रार्थना रूम आणि सभागृह सुद्धा भव्य आहेत. याशिवाय शाळेच्या आवारात लावण्यात आलेले झाडे शाळेच्या सुंदर्तेत आणखी भर करीत असतात. 

अभ्यासाशिवाय खेळण्यासाठी सुद्धा खूप चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेचे मोठेच पटांगण आहे जेथे आम्ही क्रिकेट, फुटबॉल, कब्बडी, खोखो, रनिंग असे खेळ खेळतो. माझ्या शाळेत एक मोठे ग्रंथालय आहे या ग्रंथालयात शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त वेगवेगळी कथा आणि कादंबरीची पुस्तके उपलब्ध आहेत. शाळेच्या ग्राउंड फ्लोउर वर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठे ऑडिटोरियम म्हणजेच सभागृह आहे. 

माझ्या शाळेत जवळपास 2 प्राचार्य, 60 शिक्षक आहेत, झाडांच्या साफ सफाई साठी एक माळी, शाळेच्या स्वच्छतेसाठी 3 कर्मचारी, दोन वॉचमन आणि ऑफिस कामासाठी क्लर्क सोबत इतर स्टाफ पण आहे. शिक्षणाची गुणवत्ता पाहता माझी शाळा मागील बऱ्याच वर्षांपासून शहरात पाहिल्या स्थानावर आहे. कारण या शाळेतून निघालेले जवळपास 90% विद्यार्थी मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. 

माझ्या शाळेच्या यशाचे पूर्ण श्रेय येथील शिक्षकांना जाते. आमचे शिक्षक अतिशय मन लाऊन सोप्या पद्धतीने सर्व विषय समजावून सांगतात. आमच्या शाळेत शालेय अभ्यासा एवजी इतर कौशल्य विकासावरही भर दिला जातो. आमचे शिक्षक पुस्तकी ज्ञाना सोबतच प्रात्यक्षिक शिक्षणावर पण भर देतात. 

आमच्या शाळेत सर्व सण उत्सव साजरे केले जातात. महत्वाचे दिवस व महान नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथि ला भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात. या शिवाय शाळेत आम्हाला पोहणे, गाणे, स्केटिंग इत्यादि गोष्टी शिकवले जातात.

इत्यादी अनेक कारणांमुळे मी कस्तुरबा शाळेपासून अतिशय संतुष्ट आहे. येथील सर्व शिक्षक सदैव मदतीला तयार असतात. आणि या सोबतच माझ्या शाळेचे वातावरण सुद्धा अतिशय निसर्गरम्य आहे. म्हणूनच मला माझी शाळा खूप आवडते.

***


तर मित्रांनो या लेखात आपल्यासोबत माझी शाळा निबंध या विषयावरील काही सुंदर निबंधाचे लेख देण्यात आलेले आहेत. आम्ही आशा करतो की हे My School Essay in MarathiMajhi Shala Nibandh आपणास आवडले असतील. आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेन्ट द्वारे विचारू शकतात. धन्यवाद.. 


READ MORE:

Sunday, 24 December 2023

माझी आई (मातृ दिवस) मराठी भाषण। Speech on Mother in Marathi

माझी आई मराठी भाषण। Mazi Aai Bhashan Marathi, Speech on My mother in Marathi 

आई ही एकमेव अशी व्यक्ति असते जी आपल्याल इतरांपेक्षा 9 महीने अधिक ओळखत असते. आईला तिच्या बाळाच्या आवडी निवडी सर्वकाही माहीत असते. एक आई आपल्या मुलाच्या भल्यासाठी व प्रगती साठी काळजी घेत असते. 

जर आपण आपल्या आईसाठी मातृ दिनाचे भाषण शोधत असाल तर हा लेख आपल्या नक्कीच उपयोगाचा ठरणार आहे. कारण या लेखात आम्ही आपल्यासाठी माझी आई या विषयावरील काही सुंदर मराठी भाषणे घेऊन आलेलो आहोत. तर चला सुरू करूया.

Mazi Aai: Marathi speech on Mother.

1) {मातृ दिन} माझी आई मराठी भाषण - Speech on Mother in Marathi

आपल्या जीवनात वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळे नाते संबंध असतात. पण या सर्व नात्यामध्ये सर्वात विशेष नाते है आईचे असते. आपल्या प्रत्येक समस्येत व दुःखात ती सोबत उभी असते. माझ्या आईने देखील मला कधीच असा अनुभव होऊ दिला नाही की मी एकटा आहे. मी चिंतित असलो की ती माझ्या मनातील गोष्ट ओळखून घेते. सकाळी मला उठवण्यापासून तर रात्री झोपे पर्यंत ती माझी काळजी करते. 

खरे पाहता माझी आई माझ्यासाठी देवदूत आहे आणि माझीच आई नाही तर तुम्हा सर्वाची आई पण तुमच्यासाठी देवदूत असेलच. कारण एक आई आपल्या मुलांसाठी जेवढे त्याग करते तेवढे या जगात कोणीही करत नाही. मुलाला जन्म देताना आईला असह्य वेदना होतात. पण तिचे मुलावरील प्रेम कधीहि कमी होत नाही. 

बऱ्याचदा आपण आपल्या आईच्या या प्रेमाला न समजता तिच्यावर रागावून जातो पण आपल्या हजारो चुकांवर पण आई रुसत नाही. म्हणून आपल्याला नेहमी आपल्या आईचा सन्मान करायला हवा. जगातील सर्व सुखे जरी मिळाले तरी ते आईच्या प्रेमापुढे शून्य आहे म्हणूनच म्हटले जाते की "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी". 

आई फक्त आपले पालनपोषण नाही करत तर ती आपल्या जीवनातील शिक्षक व सर्वात चांगल्या मित्राची भूमिका पण बजावते. आई हीच माणसाचा पहिला गुरु असते. प्रत्येक संकटातून मार्ग दाखवायचे काम आई करीत असते. मी जर कधी आजारी पडलो तर आई पूर्ण रात्र झोपत नाही, माझ्या चिंतेत लागलेली असते. 

हेच कारण आहे की आपण आईचे उपकार फेडू शकत नाही. म्हणून आपल्या आई वडिलांशी कधीही त्याचे मन दुखवेल असे वागू नका.


2) मातृ दिन मराठी भाषण - Mazi Aai Bhashan Marathi 

आई हा शब्द फक्त दोन अक्षरांचा आहे पण या एका लहानश्या शब्दात संपूर्ण कुटुंब सामावलेले आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात आई ही सर्वात महत्त्वाचे पात्र असते. जन्माला आलेली लहान मुले सर्वात आधी 'आई' हाच शब्द बोलायला शिकतात. आई ही पहिला गुरु असते. योग्य अयोग्य आई लहानपणीच समजावून सांगते. आई ही आपल्या मुलाला सर्वात जास्त प्रेम करते. आई परमेश्वराचे दुसरे रूप असते, जो आईचे ऐकतो तो आयुष्यात यशस्वी होतो. 

जीवनात तुम्ही कितीही तरक्की करा, पैसे कमवा, पण जर तुमची आई खुश नसेल तर कमावलेला सर्व पैसा रद्दी आहे. आई वडील असणे जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जर आपले आईवडील जिवंत आहेत तर आपण खरंच भाग्यवान आहात. कारण बऱ्याच मुलाचे आई वडील नसतात. ज्या प्रमाणे माश्याला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्याच प्रमाणे मुलांसाठी आई प्रिय असते. 

आई वडील हे आपल्या मुलांना प्रेम तर भरपूर करतात पण वेळ आल्यावर हेच आई वडील कठोर देखील बनतात. आपल्या मुलांना योग्य शिस्त आणि शिक्षण देण्यासाठी ते कष्ट करतात. वडील हे बाहेरच्या कामात व्यस्त असतात पण आई ही मुलांना योग्य वळण लावायचे काम करते. आई ही मुलांची सुरक्षा ढाल असते. ज्या प्रमाणे आई स्वतःचे दुःख विसरून आपल्यासाठी कष्ट करते, त्याप्रमाणेच आपण आई वडिलांच्या म्हातारपणात त्यांची योग्य देखरेख करायला हवी.

***

वाचा> माझी आई निबंध मराठी 


तर मित्रांनो वरील पोस्ट मध्ये आपल्याला माझी आई या विषयावरील मातृ दिनाचे मराठी भाषण देण्यात आलेले आहेत. आम्ही आशा करतो की हे भाषण आपल्या नक्कीच उपयोगाचे ठरेल व Speech on Mother in Marathi ला उपयोगात घेऊन आपण आपल्यासाठी एक छान स्वत चे भाषण तयार कराल.

Wednesday, 20 December 2023

(Top5) माझी आई निबंध मराठी । My Mother Essay in Marathi

माझी आई निबंध मराठी - My Mother Essay in Marathi : मित्रानो आई ही बाळाचा पहिला गुरु असते. असे म्हटले जाते की 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी'. आई शिवाय एक सुखी जीवनाची कल्पनाच करता येत नाही. बऱ्याचदा शाळा कॉलेज मध्ये माझी आई या विषयवार निबंध लिहिण्यास सांगीतला जातो. 

म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी माझी आई निबंध मराठी - My Mother Essay in Marathi घेऊन आलो आहोत. या लेखात माझी आई विषयावरील तीन निबंध देण्यात आले आहेत. या तिन्ही निबंधांचा आपण अभ्यास करू शकतात. तर चला My Mother Essay in Marathi ला सुरुवात करूया...


माझी आई निबंध

माझी आई निबंध मराठी | Essay on my mother in marathi 

(150 words)

मला माझी आई खूप आवडते कारण ती आई असण्यासोबतच माझी खूप चांगली मैत्रीण देखील आहे. माझी आई नेहमी माझी काळजी घेते. ती रोज सकाळी आमच्यासाठी नाश्ता बनवते आणि माझा शाळेचा डब्बा चविष्ट पदार्थांनी भरून देते. 

ती रोज सकाळी सर्वांच्या उठण्याधीच सर्व व्यवस्था करून ठेवते. माझी आई माझे आरोग्य आणि जेवणाची खूप काळजी करते. ती तिच्या मोकळ्या वेळात मला माझ्या शाळेच्या होमवर्क मध्ये सुद्धा मदत करते. 

मला माझ्या आई सोबत बाजारात जायला खूप आवडते. माझी आई आमच्या सर्वांच्या गरज व इच्छांची खूप काळजी करते. आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती स्वतः कडे सुद्धा दुर्लक्ष करते. माझी आई माझ्या आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या योग्य व्यवस्थेकडे लक्ष ठेऊन असते, तिला कायम आमची काळजी लागलेली असते. 

ती कधीही मला कंटाळा येऊ देत नाही. जरी ती दिवसभर घरात कामे करीत असली तरीही ती कधीही या बद्दल तक्रार करीत नाही. ती कुटुंबातील सर्व सदस्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते.

आई ही खरोखर परमेश्वराने दिलेले सर्वात चांगले उपहार आहे. मी कायम तिचे उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत असतो.

***


माझी आई निबंध मराठी | Essay on my mother in marathi 

(५०० words)

माझ्या आयुष्यात जर कोणी माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकला असेल, तर ती माझी आई आहे. माझ्या आईने मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत, ज्या मला संपूर्ण आयुष्य उपयोगी ठरणार आहेत. आणि म्हणूनच मी अभिमानाने सांगू इच्छितो की माझी आई माझा गुरु व आदर्श असण्यासोबताच माझ्या जीवनाचा प्रेणास्रोत देखील आहे. आई हा शब्द जरी दोन अक्षरांचा असला तरी या शब्दात संपूर्ण सृष्टि समावलेली आहे, आई हा एक असा शब्द आहे ज्याच्या महत्त्वाबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे. 

आपण आई शिवाय एका सुखी जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. आईच्या महानतेचा अंदाज याच गोष्टीवरून लावता येईल की एका वेळेला व्यक्ती देवाचे नाव घेणे विसरेल पण आई चे नाव विसरत नाही. आईला प्रेम व करुणे चे प्रतीक मानले जाते. एक आई ही जगभराचे दुख, वेदना आणि कष्ट सहन करून सुद्धा आपल्या मुलाला चांगल्यात चांगली सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करते.  

आई आपल्या मुलांना सर्वाधिक प्रेम करत असते. एका वेळी ती स्वतः उपाशी झोपेल पण आपल्या मुलाबाळांसाठी जेवणाची योग्य व्यवस्था करण्यास विसरणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्यांची आई एका शिक्षकापासून पालनकर्ता पर्यंत च्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. म्हणूनच आपल्याला आपल्या आईचा कायम सन्मान करायला हवा. कारण एक वेळेला ईश्वर आपल्यापासून नाराज होऊ शकतो पण आई कधीही तिच्या मुलांवर नाराज होत नाही. हेच कारण आहे की आपल्या जीवनात आईच्या या नात्याला इतर सर्व नात्यापेक्षा श्रेष्ठ म्हटले आहे. 

माझ्या आईचे नाव निलम आहे ती खूपच धार्मिक स्वभावाची स्त्री आहे. ती जास्त शिकलेली नाही आहे. परंतु तरीही तिला सांसारिक गोष्टींचे खूप ज्ञान आहे. घराची कामे करण्यात तिला विशेष आवड आहे. माझी आई घरातील सर्व सदस्यांची योग्य काळजी घेते. मला एक भाऊ आणि बहीण आहेत. आई आम्हा तीनही भाऊ बहिणीला समान प्रेम करते. जर घरात कोणी आजारी पडले तर आई त्याची दिवस रात्र काळजी घेते. अश्या वेळी ती रात्र रात्र जागून आमची काळजी करते. माझी आई एक दयाळू आणि उदार मनाची महिला आहे. ती वेळोवेळी गरिबांना दानधर्म करते. तिला गरीब व गरजू लोकांना अन्न देण्यात आनंद वाटतो. माझी आई दररोज न चुकता मंदिरात जाते व सण उत्सवाच्या दिवशी उपवास देखील करते. 

आई आमच्या चारित्र्य विकासावर विशेष लक्ष देते. तिची इच्छा आहे की आम्ही एक आदर्श नागरिक बनावे. दररोज संध्याकाळी आई आम्हाला धार्मिक बोधकथा सांगते. या कथांद्वारे आमचे भविष्य अधिक उज्ज्वल कसे करता येईल यावर तिचा भर असतो. 

माझ्या आईला सकाळ पासून तर रात्र होईपर्यन्त घराची सर्व कामे करावी लागतात. ती सकाळी 5 वाजता उठते. आमच्या उठण्याआधीच ती आमच्या चहा नाश्त्याची व्यवस्था करून ठेवते. नंतर माझ्या शाळेच्या वेळे आधी ती जेवण व माझा डबा तयार करून देते. आम्हाला शाळेत पाठवल्यानंतर ती मंदिरात जाते. मंदिरातून परत आल्यावर घरातील इतर कामे आवरते. दिवसभर काही न काही काम सुरूच असतात आणि संध्याकाळी पुन्हा तिला स्वयंपाक करावा लागतो. अश्या पद्धतीने माझी आई दिवसभर व्यस्त असूनही ती आमच्यासाठी वेळ काढत असते.

देवाने मला जगातील सर्वात चांगली आई दिल्याबद्दल मी आभारी आहे. व मी कायम परमेश्वराजवळ आईच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत असतो.

***


माझी आई विषयावर 10 ओळी | 10 lines on my mother in marath

  1. माझी आई जगातील सर्वात चांगली आई आहे.
  2. माझी आई माझ्यासाठी सर्वात महत्वपूर्ण आहे.
  3. माझी आई मला खूप प्रेम करते.
  4. ती माझ्यासाठी स्वादिष्ट व्यंजन बनवते.
  5. मला रोज सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार करते.
  6. माझी आई मला अभ्यासात मदत करते.
  7. मी सुद्धा घराच्या कामात आईला मदत करतो.
  8. माझी आई मला चांगल्या गोष्टी शिकवते.
  9. माझी आई मला दररोज छान छान गोष्टी सांगते.
  10.  माझी आई मला प्रेमाने दादू म्हणते.


माझी आई निबंध मराठी | My Mother Essay in Marathi

(200 शब्द)

जेव्हा मुलगा पहिल्यांदा बोलणे सुरू करतो तेव्हा त्याचा पहिला शब्द आई असतो. लहान मुलांसाठी आई ही सर्वकाही असते. आई शिवाय घर सुनेसुने वाटते. प्रत्येकाच्या जीवनात आईचे भरपूर महत्व असते, म्हणून मोठंमोठ्या लोकांनी आईच्या प्रेमाचा महिमा गायला आहे. जेव्हा आपण जन्माला येतो, मोठे होऊन चालायला लागतो, बोलणे सुरू करतो, शाळेत जायला लागतो या प्रत्येक ठिकाणी आई ही आपल्या सोबतच असते. आईला परमेश्वराचे दुसरे रूप मानले जाते. असे म्हणतात की देव प्रत्येकाजवळ राहू शकत नाही म्हणून त्याने आईला बनवले. आपल्या संस्कृतीती आईला देवी समान पूजनीय मानले जाते.  

आई ही एकच अशी व्यक्ती आहे जी स्वतःच्या दुःखांना विसरून मुलांच्या सुखासाठी प्रयत्न करते. स्वतःच्या जेवणाआधी ती मुलांना अन्न भरवते. आई ही मुलांना कधीही भुखे झोपू देत नाही, रात्री जर मुलाला झोप येत नसेल तर आई अंगाई गीत गाऊन झोपवते. आई मुलांना राजा राणी व पऱ्यांच्या सुंदर गोष्टी सांगते. आई आपल्या मुलांकडे पाहून नेहमी खुश होते. मुलांना जर थोडे पण दुःख झाले तर ती विचलित होते. आपले सर्व दुःख व चिंताना विसरून ती मुलांचे दुःख आधी दूर करते. अशी ही प्रत्येकाची आई असते. 

आई शब्द ऐकून आपले मन प्रफुल्लित होते. म्हणून ज्या पद्धतीने आई आपली चिंता व देखभाल करते त्याच पद्धतीने आई व वडिलांच्या म्हातारपणात आपण देखील त्याची देखभाल करायला हवी.

***


तर मित्रांनो हे होते माझी आई निबंध मराठी - Essay on my mother in marathi. या निबंधांचा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता My Mother Essay in Marathi या लेखात उत्तम निबंधांचा समावेश करण्यात आलेला आहे. आशा आहे आपणास हे निबंध आवडले असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद...